मुंबईत आणखी एक जम्बो कोविड सेंटर : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:06 IST2021-04-26T04:06:46+5:302021-04-26T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारने केलेली विनंती केंद्र सरकारने ...

Another Jumbo Covid Center in Mumbai: Devendra Fadnavis | मुंबईत आणखी एक जम्बो कोविड सेंटर : देवेंद्र फडणवीस

मुंबईत आणखी एक जम्बो कोविड सेंटर : देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी राज्य सरकारने केलेली विनंती केंद्र सरकारने तत्काळ मान्य केली आहे. केंद्र सरकारकडून आणखी एक दिलासा मिळाल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बीपीसीएलच्या जागेतील कोविड सेंटरबाबत फडणवीस यांनी सोशल मीडियातून माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परवानगी दिली आहे. याबद्दल त्यांचे आभार मानताच फडणवीस म्हणाले की, या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील.

बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कॉम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलिंडर्स भरून देण्याचीही तयारी दर्शविली आहे. यामुळेही मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल.

Web Title: Another Jumbo Covid Center in Mumbai: Devendra Fadnavis