झाड कोसळून आणखी एक मृत्यू
By जयंत होवाळ | Updated: July 2, 2024 20:36 IST2024-07-02T20:36:17+5:302024-07-02T20:36:41+5:30
सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना घडली.

झाड कोसळून आणखी एक मृत्यू
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : झाड कोसळून वरळी येथे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी परळ येथे या घटनेची पुनरावृत्ती झाली. या दुर्घटनेत कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला तिला उपचारासाठी केईएम रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र ती वाचू शकली नाही.
परळ सयानी रोड , परळ बस डेपोच्या समोर ही घटना घडली. सकाळी दहा वाजता वर्षा मेस्त्री ही महिला कचरा गोळा करत असताना तिच्यावर झाड कोसळले. झड कोसळल्याने ती झाडाखाली दबून गेली. लोकांनी तिला बाहेर काढून केईएम रुग्णालयात नेले. मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत.
सोमवारी वरळी बीडीडी चाळ येथे झाड पडून एका ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना घडली.