Another chance to travel by jeep miles to another | जेपी माइल्समुळे अन्य विमानाने प्रवासाची संधी
जेपी माइल्समुळे अन्य विमानाने प्रवासाची संधी

मुंबई : जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाली असली तरी जेट प्रिव्हिलेज माइल्सच्या (जेपी माइल्स) ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही. जेपी माइल्सचा वापर करून दुसऱ्या कंपनीद्वारे प्रवास करता येईल. जे पी माइल्स हा रिवार्ड कार्यक्रम असून जेट प्रिव्हिलेज ग्राहकांना याद्वारे मिळणाºया पॉइंट्सचा वापर करून दुसºया कंपनीद्वारे तिकीट काढता येणे शक्य आहे. पॉइंट्स रिडीम करून ही सेवा मिळवता येईल.
मुंबई-दिल्ली प्रवासासाठी ८५०० जेपी माइल्स, मुंबई-गोवा प्रवासासाठी ५ हजार माइल्स, कोलकाता-दिल्ली प्रवासासाठी ९५०० माइल्स, बेंगळुरू-दिल्ली प्रवासासाठी १२ हजार माइल्स, मुंबई-लंडन प्रवासासाठी ४२ हजार माइल्स, दिल्ली-सिंगापूर प्रवासासाठी ३० हजार माइल्स वापरून तिकीट मिळविता येईल, असे सांगण्यात आले. सातत्याने हवाई प्रवास करणाºया प्रवाशांसाठी जेटद्वारे जेट प्रिव्हिलेज योजनेद्वारे जेपी माइल्स पॉइंट्स दिले जातात व त्याद्वारे त्यांना विविध सवलती पुरविल्या जातात. जेटची सेवा बंद झाल्यानंतरही ही सेवा सुरू ठेवल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


Web Title: Another chance to travel by jeep miles to another
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.