वाझे-मनसुख भेटीचे आणखी एक सीसीटीव्ही फूटेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:04 IST2021-03-30T04:04:42+5:302021-03-30T04:04:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सचिन वाझे व मनसुख हिरेन हे सीएसएमटी परिसरात भेटल्याचे आणखी एका सीसीटीव्ही ...

वाझे-मनसुख भेटीचे आणखी एक सीसीटीव्ही फूटेज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सचिन वाझे व मनसुख हिरेन हे सीएसएमटी परिसरात भेटल्याचे आणखी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या भेटीत हिरेन ‘त्या’ स्काॅर्पिओची चावी इनोव्हाच्या चालकाकडे देत असल्याचे दिसत आहे.
अंबानीच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्काॅर्पिओ १२ फेब्रुवारीला चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी दिली होती. प्रत्यक्षात ती चोरीला गेलीच नव्हती. वाझेच्या सांगण्यावरून त्याबाबत खोटी तक्रार नोंदविण्यात आली होती, ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे एनआयएचे तपास पथक त्याबाबतचा अधिक तपशील जाणून घेत आहे. वाझे व मनसुख हे सीएसएमटी परिसरात भेटल्याचे आणखी एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज सापडले असून, त्यामध्ये हे दोघे सुमारे १० मिनिटे चर्चा करतात, त्यानंतर हिरेन गाडीची चावी इनोव्हाच्या चालकाकडे देऊन निघून जात असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे.
.....................