Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप कुमार यांच्या आणखी एका भावाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 03:31 IST

एहसान हे उच्च रक्तदाब, अल्झायमरने त्रस्त होते. त्यातच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे लहान भाऊ एहसान खान यांचे कोरोनामुळे निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते.एहसान हे उच्च रक्तदाब, अल्झायमरने त्रस्त होते. त्यातच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्या निधनापूर्वी त्यांचा दुसरा भाऊ अस्लम खान यांचेही २१ आॅगस्ट रोजी लीलावती रुग्णालयातच निधन झाले होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. केवळ १२ दिवसांमध्ये दिलीप कुमार यांनी दोन्ही भाऊ गमावले. त्यामुळे दिलीप कुमार यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली.

टॅग्स :दिलीप कुमार