सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST2021-02-06T04:08:50+5:302021-02-06T04:08:50+5:30

एनसीबीची कारवाई : चौघांकडे चौकशी सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाच्या ...

Another arrested in Sushant Singh Rajput death case | सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी आणखी एकाला अटक

एनसीबीची कारवाई : चौघांकडे चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाच्या तपासावर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) पुन्हा भर दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी आणखी एकाला अटक केली. जगताप सिंग आनंद असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सहायक दिग्दर्शक ऋषीकेश पवार याला अटक करण्यात आली आहे. या दोघांसह करण सजनानी व राहिला फर्नीचरवाला यांना चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे.

सुशांतसिंहच्या व्यसनांबद्दल या सर्वांना माहिती होते. त्यामुळे त्याबद्दल समोरासमोर बसवून त्यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे समजते. जगतापसिंग आनंद हा यापूर्वी अटक केलेल्या करमजित सिंग या तस्कराशी संबंधित असल्याचे समजते. पवार हा सुशांतला गांजा व हाशिम पुरवित होता. मात्र, त्याचे प्रमाण कमी होते. तसेच बॉलिवूडमध्ये अनेकांना तो ड्रग्ज पुरवत होता. सुशांतसिंहच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये काम करीत असल्याने तो काही महिने त्याचा रूममेट म्हणून राहायला होता. त्याच्यासह जगतापसिंग हादेखील सुशांतसिंहला गांजा व हाशिम पुरवित असल्याने त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याचबरोबर न्यायालयीन कोठडीत असलेल्या करण सजनानी व राहिला फर्नीचरवाला यांना जेलमधून एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले.

......................

Web Title: Another arrested in Sushant Singh Rajput death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.