Join us  

बेस्ट उपक्रमाला वार्षिक २४० कोटींचे नुकसान; वाहक, चालकांच्या कमतरतेचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 2:23 AM

बेस्ट उपक्रमाला वार्षिक २४० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. 

मुंबई : वाहन चालक आणि वाहकांचा तुटवडा असल्याचा मोठा फटका बेस्ट उपक्रमाला बसू लागला आहे. भाडेकपात आणि कर्मचारी संख्या कमी असल्याने बसगाड्या आगाराबाहेर पडण्यास विलंब होणे, बसगाड्यांना लागणारा लेटमार्क आणि दररोज अडीच ते तीन हजार कार्यालयीन तासांचे नुकसान होत आहे. बेस्ट उपक्रमाला वार्षिक २४० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. बेस्ट उपक्रमाचा सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बेस्ट समितीच्या बैठकीत शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास मंजूर करण्यात आला़ महापालिकेने आर्थिक टॉनिक दिल्यानंतर बेस्ट उपक्रमाची तूट तब्बल २,२५० कोटींवर पोहोचणार आहे़ जुलै महिन्यात बस भाड्यात कपात केल्यानंतर तब्बल दहा लाख प्रवाशी वाढले.मात्र, तूट तरीही वाढतच असल्याची चिंता सर्वपक्षीय सदस्यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून व्यक्त केली़, तर भाजप सदस्यांनी बेस्टची स्थिती खालवण्यास शिवसेनेला जबाबदार धरले आहे. वाहन चालक आणि वाहकांची संख्या कमी असताना साप्ताहिक सुट्टीमुळे शनिवारी ४० टक्के तर रविवारी ६० टक्के कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. याचा परिणाम बसगाड्यांच्या फेऱ्यांवर होतो़ दररोज सरासरी अडीच ते तीन हजार तास कमी फेºया होत असल्याने दरमहा २० कोटी रुपयांचे बेस्ट उपक्रमाचे नुकसान होत असल्याचे भाजपचे सदस्य श्रीकांत कवठणकर यांनी निदर्शनास आणले़ बसगाड्यांचा ताफा ४,०५० पर्यंत वाढविण्यात येईल, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने दिले होते. मात्र, सध्या केवळ ३,१९८ बसगाड्या असल्याचा फटकाही बेस्टच्या उत्पन्नाला बसत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले.बसगाड्यांचा ताफा ४,०५० पर्यंत वाढविणे अपेक्षित असताना ३,१९८ बसगाड्या आहेत़बसगाड्यांच्या फेºया कमी होत असल्याने, दरमहा २० कोटी आणि वार्षिक २४० कोटी रुपयांचे नुकसान बेस्ट उपक्रमाला होत आहे़ भाडेकपातीनंतर बेस्टच्या तिजोरीत आठ कोटींची चिल्लर आहे़भाडेतत्त्वावर २३ बसगाड्या बेस्ट उपक्रमाने आतापर्यंत घेतल्या आहेत़ तब्बल हजार मिडी आणि मिनी वातानुकूलित व साधारण बसगाड्या घेण्याचा निर्णय बेस्टने घेतला़ मात्र, या बसगाड्या कधी ताफ्यात येणार, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही़ बेस्टकडे असलेल्या ३,३३७ बसगाड्यांपैकी २०२०-२०२१ मध्ये ८९६ बसगाड्या वयोमर्यादेनुसार भंगारात काढण्यात येणार आहेत़ यापैकी ७३६ सिंगल डेकर तर ७२ डबलडेकर बसगाड्यांचा समावेश आहे़बेस्ट समितीमध्ये तुटीचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर, आता अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे़ तिथे मात्र या अर्थसंकल्पावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे़कमी दरानंतरही बस आगारांमध्ये पार्किंग कमीचमुंबई : बस आगारांची जागा खासगी वाहनांसाठी खुली केल्यानंतर बेस्ट उपक्रमाने पार्किंग दरातही कपात केली़, तरीही गेल्या तीन महिन्यांमध्ये केवळ ५,०५६ खासगी बसगाड्या आणि २३७ शालेय बसगाड्यांनी बस आगारातील पार्किंगची जागा वापरली आहे़१ आॅगस्टपासून बेस्ट उपक्रमाने बस आगारांमधील पार्किंगच्या दरात कपात केली़ बेस्टच्या २४ बस आगार आणि ३६ बस स्थानकांमध्ये दिवसा साडेतीन हजार आणि रात्रीच्या वेळेत ३२५ खासगी बसगाड्या दररोज उभ्या राहू शकतात़ मात्र, आॅगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या एकूण दहा हजार ५६५ बसगाड्यांनी बस आगारांमधील पार्किंगचा लाभ घेतला आहे़ पर्यटन, शाळा, कॉर्पोरेटच्या कर्मचाºयांसाठी, तसेच शहर अंतर्गत तब्बल १४ हजार बसगाड्या मुंबईत आहेत़ मात्र, आतापर्यंत ५,०५६ बसगाड्या तीन महिन्यांच्या कालावधी बस आगारात उभ्या राहिल्या आहेत़ यापैकी ३,७४५ चारचाकी, ८६१ दुचाकी आणि ३२५ ट्रकचा समावेश आहे़ २३७ शालेय बसगाड्या आणि २३७ तीनचाकी गाड्याही या काळात बस आगारांमध्ये पार्क करण्यात आल्या होत्या़बस तिकीट दरात वाढ करण्याची मागणीमुंबई : बेस्टची तूट वाढण्यास बस तिकीटदरात केलेली मोठी कपात कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी वातानुकूलित बसगाड्यांचे सध्याचे तिकीट दर ६ रुपये ऐवजी १० रुपये करण्यात यावे, अशी मागणी सदस्यांकडून पुढे आली आहे़बेस्ट बसच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील गाड्यांचा समावेश होत आहे, तसेच तिकीटदरात मोठी कपात करण्यात आल्याने, प्रवासी संख्या १० लाखांनी वाढली आहे, परंतु बेस्टच्या उत्पन्नात घट होत आहे. भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद बघून मगच बसच्या तिकीटदरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे संकेत बेस्ट उपक्रमाकडून बेस्ट समितीच्या बैठकीत देण्यात आले आहेत.मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तिकिटांचे दर कमी केल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी केला, तर बेस्टला वाचविण्यासाठी बेस्टचा अर्थसंकल्प हा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.वीज विभाग १०० कोटी नफ्यातबेस्ट उपक्रमाने सादर केलेल्या सन २०२०-२१च्या अर्थसंकल्पात बेस्टच्या वीज विभागाचे उत्पन्न ४,०६३ कोटी रुपये तर खर्च ३९६३.२७ कोटी रुपये म्हणजे वीज विभागाला १००.२७ कोटी रुपयांची नफ्यात दाखविले आहे. मात्र, परिवहन विभागाचे उत्पन्न १४९५.९१ कोटी रुपये, तर खर्च मात्र ३८४५.३८ कोटी रुपये म्हणजे परिवहन विभागाचा तोटा थेट २३४९.४७ कोटी रुपये एवढा प्रचंड दाखविण्यात आला आहे. बेस्टच्या वीज व परिवहन विभागाचे एकूण उत्पन्न ५५५८.९१ कोटी रुपये आणि खर्च ७८०८.६५ कोटी रुपये म्हणजे बेस्ट उपक्रमाला एकूण २२४९.७४ कोटी रुपये तोट्यात दाखविण्यात आले आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई महानगरपालिकामुंबई