Join us

‘महाराष्ट्र’ दिनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची घोषणा - रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 04:49 IST

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज्यातील तब्बल एक लाखाहून अधिक एसटी कर्मचाºयांच्या वेतनवाढीबाबतची घोषणा करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले. सोमवारी मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात झालेल्या विशेष बैठकीत मंत्री रावते यांनी ही घोषणा केली.

मुंबई - महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज्यातील तब्बल एक लाखाहून अधिक एसटी कर्मचाºयांच्या वेतनवाढीबाबतची घोषणा करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जाहीर केले. सोमवारी मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयात झालेल्या विशेष बैठकीत मंत्री रावते यांनी ही घोषणा केली. या वेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल उपस्थित होते.गेल्या २४ महिन्यांपासून एसटी कर्मचाºयांचा वेतन कराराचा प्रश्न अनुत्तरित आहे. या कालावधीत कोणत्या कारणामुळे करार रखडला यावर चर्चा करणे निरर्थक आहे. यापुढे मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने महामंडळासोबत सकारात्मक भूमिक घेत चर्चा करावी. आगामी दिवसांत ही चर्चा निष्फळ ठरल्यास मी स्वत: कर्मचाºयांसाठी वेतन कराराची घोषणा १ मे रोजी करेन, असे मंत्री रावते यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यात रोज १६ हजार ४४७ बस धावतात. या बसच्या नियोजनासाठी एसटी मध्ये सद्य:स्थितीत १ लाख १ हजार ३७३ कर्मचारी आहेत. मान्यताप्राप्त संघटनेसह २१ संघटनांच्या पदाधिकाºयांनी सोमवारी झालेल्या बैठकीत उपस्थिती दर्शवली. बैठकीत सर्व संघटनांना कर्मचाºयांचा वेतन करार जलद गतीने करा. एसटी कर्मचाºयांचे वेतन तुटपुंजे असल्याने महामंडळ आणि संघटनांनी हेवेदावे विसरून करारासंबंधात वाटाघाटी करणे गरजेचे असल्याचे मत विविध संघटनांनी व्यक्त केले.असा असेल अपेक्षित नवा करारनव्या वेतन करारामध्ये सध्या कार्यरत असलेल्या सुमारे ६० हजार कनिष्ठ वेतनश्रेणी कामगारांना योग्य पगारवाढ मिळेल, नव्या करारानुसार कर्मचाºयांना थकबाकी दोन ते चार हफ्त्यांमध्ये मिळणार, आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत घेणार, सर्व कर्मचारी-अधिकाºयांना सन्मानजनक वेतनवाढ.

टॅग्स :राज्य परीवहन महामंडळदिवाकर रावते