एमएचटी-सीईटी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर; १ ते २० ऑक्टोबरदरम्यान पीसीबी, पीसीएमच्या परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 07:00 IST2020-09-10T01:49:11+5:302020-09-10T07:00:28+5:30
सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया लवकरच सीईटी सेलच्या संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.

एमएचटी-सीईटी परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर; १ ते २० ऑक्टोबरदरम्यान पीसीबी, पीसीएमच्या परीक्षा
मुंबई : एमएचटी-सीईटीच्या पीसीबी (भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-जीवशास्त्र) गटाच्या परीक्षा १ ते ९ आॅक्टोबरदरम्यान तर पीसीएम (भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित) गटाच्या परीक्षा या १२ ते २० आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. यासंबंधित अधिकृत घोषणा सीईटी सेलने केली असून, याचे सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया लवकरच सीईटी सेलच्या संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.
आता आॅक्टोबरच्या १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना पीसीबी गटाच्या तर १२, १३, १४, १५, १६, १९, २० आॅक्टोबरला पीसीएम गटाच्या परीक्षा होतील. राज्यात इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बीएड अशा अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी तब्बल ५ लाख ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.