‘अंजू’ने शोधला अंमलीपदार्थ
By Admin | Updated: February 6, 2015 00:59 IST2015-02-06T00:59:09+5:302015-02-06T00:59:09+5:30
कस्टमच्या अंजू नावाच्या प्रशिक्षित श्वानाने गुरूवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मालवीया देशातील महिलेची एफीड्रीन तस्करी रोखली.

‘अंजू’ने शोधला अंमलीपदार्थ
मुंबई : कस्टमच्या अंजू नावाच्या प्रशिक्षित श्वानाने गुरूवारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मालवीया देशातील महिलेची एफीड्रीन तस्करी रोखली. अंजूने या महिलेकडे अंमलीपदार्थ असल्याचा सिग्नल विमानतळावरील कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनीटला दिला आणि तब्बल दहा किलो एफीड्रीन हे पार्टीड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असलेले रसायन हस्तगत झाले. पोया थेम्बीसाईल असे मालवीयन महिलेचे नाव असून ती हैद्राबादहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. येथून ती इथोपियाला रवाना होणार होती. तिच्याकडील सामानात हेल्मेटस आढळली. या हेल्मेटमध्ये एफीड्रीन दडविण्यात आले होते.