Join us

अनिकेतने बनवले एप्रिल फूल, लाखोंचा गंडा नव्हे हे तर फिल्म प्रमोशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 15:13 IST

मला 3 जणांच्या टोळीने लाखो रुपयांचा चुना लावला आहे, त्यामुळे मी खूप त्रासात आहे , मला काय करावे सुचत नाहीये, अशी विनवणी अभिनेता अनिकेत विश्वासराव ह्याने दोन दिवसांपूर्वी फेसबुकवरून केली होती.

मुंबई- मला 3 जणांच्या टोळीने लाखो रुपयांचा चुना लावला आहे, त्यामुळे मी खूप त्रासात आहे , मला काय करावे सुचत नाहीये, अशी विनवणी अभिनेता अनिकेत विश्वासराव ह्याने दोन दिवसांपूर्वी फेसबुकवरून केली होती. पण ह्यावर आता पडदा पडला आहे. हा एक एप्रिल फूलचा डाव होता हे आता समोर आलंय.आपल्या आगामी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अनिकेतने ही आयडियाची कल्पना लढवली होती. आज एप्रिल फूलच्या दिवशी परत एकदा फेसबुक लाइव्ह येऊन अनिकेतने ह्या सर्व गोष्टींचा उलगडा केला. आपल्याला 3 जणांनी फसवून लाखो रुपयांना फसवल्याची माहिती अनिकेतने फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली होती. माध्यमांमध्येही ह्याची चवीने चर्चा झाली.पण हा सगळा मामला एप्रिल फुलचा होता हे स्वतः अनिकेतने एप्रिल फूलच्या दिवशी परत एकदा फेसबुक लाईव्ह येऊन स्पष्ट केले. मराठी सिनेमाही आता सोशल मीडियामार्फत आपल्या आगामी सिनेमाचं अनोखं प्रमोशन करू लागली आहे आणि हा त्याचाच एक भाग होता हे अनिकेतने स्पष्ट केले. अनिकेतने फिल्म प्रमोशनच्या मार्फत एप्रिल फूल तर केले . मात्र हा सिनेमा प्रेक्षकांना मात्र एप्रिल फूल करू नये हीच अपेक्षा .