Join us  

अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन चिडले, 'टिवटिवाट' बंद करण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 9:57 AM

अॅग्री यंग मॅन अमिताभ बच्चन सध्या ट्टिवरवर प्रचंड संतापले आहेत. ट्विटरने आपले फॉलोअर्स कमी केल्याचा आरोप अमिताभ बच्चन यांनी केला आहे

मुंबई - अॅग्री यंग मॅन अमिताभ बच्चन सध्या ट्टिवरवर प्रचंड संतापले आहेत. ट्विटरने आपले फॉलोअर्स कमी केल्याचा आरोप अमिताभ बच्चन यांनी केला आहे. यामुळेच ट्विटरवरील टिवटिवाट बंद करण्याचे संकेत अमिताभ बच्चन यांनी दिले आहेत. 'या विशाल समुद्रात अनेक मासे आहेत, आणि काही त्यातही अतिशय रंजक आहेत', अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरला सुनावलं आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला.  

अमिताभ बच्चन यांनी बुधवारी रात्री 11.35 ला एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'ट्विटरने माझे फॉलोअर्स कमी केले आहेत? हा एक विनोद वाटत आहे. त्यामुळे वेळ आली आहे की, ट्विटरला रामराम केला पाहिजे. आतापर्यंतच्या प्रवासासाठी सर्वांचा आभारी आहे. या विशाल समुद्रात अनेक मासे आहेत, आणि काही त्यातही अतिशय रंजक आहेत'. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर ट्विटर सर्वात जास्त फॉलो केलं जाणा-यांमध्ये अमिताभ बच्चन यांचं नाव आहे. नरेंद्र मोदींनंतर अमिताभ बच्चन दुस-या क्रमांकावर होते. पण ट्विटरने फॉलोअर्स कमी केल्यामुळे शाहरुख खान दुस-या क्रमांकावर आला असून, अमिताभ बच्चन तिस-या क्रमांकावर आले आहेत. सध्या शाहरुख खानचे 3 कोटी 29 लाख 35 हजार 562 ट्विटर फॉलोअर्स आहेत. तर अमिताभ बच्चन यांचे 3 कोटी 28 लाख 99 हजार 787 फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनट्विटर