सिग्नलवर वाद केल्याच्या रागात दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:06 IST2020-12-25T04:06:52+5:302020-12-25T04:06:52+5:30

व्हिडीओ व्हायरल, मुजोर रिक्षाचालक अटकेत सिग्नलवर वाद केल्याच्या रागात दुचाकीला धडक व्हिडीओ व्हायरल : मुजोर रिक्षाचालक अटकेत लोकमत न्यूज ...

Anger at arguing at the signal hits the bike | सिग्नलवर वाद केल्याच्या रागात दुचाकीला धडक

सिग्नलवर वाद केल्याच्या रागात दुचाकीला धडक

व्हिडीओ व्हायरल, मुजोर रिक्षाचालक अटकेत

सिग्नलवर वाद केल्याच्या रागात दुचाकीला धडक

व्हिडीओ व्हायरल : मुजोर रिक्षाचालक अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पायावरून रिक्षा नेणाऱ्या चालकाकडे जाब विचारताच, सिग्नलवरच वाद सुरू झाला. याच रागात चालकाने थेट दुचाकीस्वाराला धडक दिल्याचा प्रकार घाटकोपर - मानखुर्द लिंक रोड परिसरात समोर आला. यात दुचाकीस्वार थोडक्यात वाचला. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना एका कारचालकाने मोबाइलमध्ये कैद केली. गुरुवारी याचा व्हिडीओ व्हायरल होताच रिक्षाचालक सलमान रज्जन सय्यद (३४) याला पाेलिसांनी अटक केली.

घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर परिसरात तक्रारदार किशोर काशिनाथ कर्डक (४२) राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास ते दुचाकीवरून घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील ईस्टर्न फ्री-वे ब्रिजखालून जात असताना सय्यदने रिक्षा त्यांच्या पायावरून नेली. याबाबत त्याच्याकडे जाब विचारताच दोघांमध्ये बाचाबाची झाली. चालकाला दम देत कर्डक पुढे निघाले असता, रिक्षाचालकाने रिक्षा बेदरकारपणे तसेच जाणीवपूर्वक वेडीवाकडी चालवून कर्डक यांच्या दुचाकीला धडक देत पसार झाला.

या धडकेत ते खाली कोसळले. पाठीमागून येणाऱ्या ट्रकने वेळीच ब्रेक दाबल्यामुळे ते थोडक्यात बचावले.

देवनार पोलिसांनी कर्डक यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करीत, सय्यदला अटक केल्याची माहिती देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली आहे.

........................

Web Title: Anger at arguing at the signal hits the bike