Join us  

मतदारांमध्ये राग, कुलस्ते जिंकणार? प्रस्थापितांविरोधात रोषाचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 5:53 AM

मांडला लोकसभा मतदारसंघात यंदा केंद्रीय ग्रामविकास मंत्री फग्गनसिंग कुलस्ते आणि माजी मंत्री व काँग्रेसचे नेते ओमकारसिंग मारकम यांच्यात चुरस होणार आहे.

विनय उपासनी, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राणी दुर्गावती, राणी अवंतीबाई लोधी यांसारख्या वीरांगनांचा देदीप्यमान इतिहास आणि पूर्वाश्रमीच्या गोंडवाना राज्याची राजधानी असलेल्या मांडला लोकसभा मतदारसंघात यंदा केंद्रीय ग्रामविकास मंत्री फग्गनसिंग कुलस्ते आणि माजी मंत्री व काँग्रेसचे नेते ओमकारसिंग मारकम यांच्यात चुरस होणार आहे. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गेल्या कैक वर्षांपासून भाजपची पकड आहे. कुलस्ते या मतदारसंघातून अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत. अपवाद फक्त २००९चा.

यंदाची निवडणूक फग्गनसिंग कुलस्ते यांना वाटते तेवढी सोपी नाही. येथे प्रस्थापितांविरोधात रोषाचे वातावरण असल्याने ओमकारसिंग मारकम यांच्याकडे मतदारांचा अधिक कल असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. केवळ विरोधकच नव्हे तर कुलस्ते यांना पक्षांतर्गत रोषालाही सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. मात्र, असे असले तरी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून या ठिकाणी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीत कळीचे मुद्दे

  • मांडलामध्ये खुद्द कुलस्ते यांच्याविरोधात पक्षांतर्गत रोष आहे. कुलस्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून खासदार आहेत. पक्षाने त्यांना सर्व काही दिले आहे. मात्र, त्यांनी मतदारसंघाऐवजी स्वत:च्या कुटुंबाचेच भले केले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
  • जबलपूर-मांडला हायवेचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याबद्दल गेल्या वर्षी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने हा मुद्दा प्रचारात हाती घेतला असून मांडलातील मतदारांमध्ये त्याबद्दल रागाची बीजे रोवली आहेत. 
  • काँग्रेसचे उमेदवार ओमकारसिंग मारकम हे लोकप्रिय नेते आहेत. गोंड आदिवासींमध्ये त्यांना मानणारे अनेक जण आहेत. कुलस्ते यांच्याविरोधात असलेला रोषाचा फायदा त्यांना होऊ शकतो.

एकूण मतदार  १९,५१,२६७ पुरुष - ९,८२,००६महिला - ९,६७,८७७

२०१९ मध्ये काय घडले?फग्गनसिंग कुलस्ते  भाजप (विजयी) ७,३७,२६६कमलसिंग मारवी काँग्रेस, (पराभूत) ६,३९,५९२

२०१९ पूर्वी कोणाची बाजी?२०१४ फग्गनसिंग कुलस्ते    भाजप    ५,८५,७२०२००९ बसोरीसिंग मसराम    काॅंग्रेस    ३,९१,१३३

टॅग्स :मध्य प्रदेशलोकसभा निवडणूक २०२४