मुंबई - मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्यांचे पाडकाम सुरू करण्याच्या कारवाईविरोधात बुधवारी धारावीत आंदोलन करण्यात आले. मराठी अभ्यास केंद्र यांच्या नेतृत्वाखाली ९० फुटी रोडवरील कामराज मेमोरियल शाळेमागे झालेल्या आंदोलनात स्थानिक रहिवासी, पालक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पालिकेने काही सुस्थितीत असलेल्या शाळा पाडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला.
आमची मुले माहीम रोड पालिकेच्या शाळेत जात होती. आता शाळेची इमारत धोकादायक असल्याचे सांगितले जात असून, ती पडून पुन्हा बांधणार आहेत. मात्र, येथील मुलांची शाळा गेली. सायन येथे पाच किलोमीटर लांब मुले चालत कशी जातील? पालिकेचा शिक्षण विभाग स्वतःच्या शाळांकडे दुर्लक्ष करीत आहे. - डॅनियल फारुकी, पालक, धारावी
पालिकेच्या मराठी शाळा बुलडोझरशाहीद्वारे पाडल्या जात आहेत; मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. मुंबईच्या जमिनी जशा नोकरशहा, लोकप्रतिनिधी यांनी गिळल्या तसा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. - डॉ. दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
महापालिकेच्या मराठी शाळांच्या इमारती स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक दाखवल्या जातात. मात्र, स्वतंत्र सल्लागार कंपन्यांच्या अहवालांनुसार त्या सुरक्षित आहेत. मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे शासन आणि महापालिकेचे प्राधान्य असायला हवे; पण दुर्दैवाने तसे होत नाही.- चिन्मयी सुमित, अभिनेत्री, मराठी शाळांच्या सदिच्छादूत
‘स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल नागरिकांपुढे ठेवा’ ‘मराठी शाळा वाचवा,’ ‘विद्यार्थ्यांचे शिक्षण वाचवा,’ ‘पालिकेची बुलडोझरशाही बंद करा’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. शाळांच्या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल महापालिका प्रशासनाने नागरिकांपुढे ठेवावा. इमारतींच्या पाडकामाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी मराठी अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आली. यावेळी मराठी शाळा वाचवण्यासाठी निदर्शने करण्यात आली.दरम्यान,
Web Summary : Dharavi residents protested against the demolition of Marathi schools deemed dangerous by the Mumbai Municipal Corporation. Led by Marathi Abhyas Kendra, protestors demanded transparency in structural audits and opposed the destruction of school buildings, citing the educational impact on students.
Web Summary : मुंबई नगर निगम द्वारा खतरनाक माने गए मराठी स्कूलों के विध्वंस के खिलाफ धारावी के निवासियों ने विरोध प्रदर्शन किया। मराठी अभ्यास केंद्र के नेतृत्व में प्रदर्शनकारियों ने संरचनात्मक ऑडिट में पारदर्शिता की मांग की और छात्रों पर पड़ने वाले शैक्षिक प्रभाव का हवाला देते हुए स्कूल भवनों के विनाश का विरोध किया।