अंगणवाडी सेविकेच्या सल्ल्याने होणार ग्रा.पं.ची १०%रक्कम खर्च
By Admin | Updated: March 10, 2015 00:23 IST2015-03-10T00:23:35+5:302015-03-10T00:23:35+5:30
बुद्धीमत्तेचा सुमारे ८० टक्के पाया मजबूत करणाऱ्या अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक साधनाची जाणीव असणाऱ्या अंगणवाडी सेविकेच्या सल्ल्यानेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना

अंगणवाडी सेविकेच्या सल्ल्याने होणार ग्रा.पं.ची १०%रक्कम खर्च
सुरेश लोखंडे, ठाणे
बुद्धीमत्तेचा सुमारे ८० टक्के पाया मजबूत करणाऱ्या अंगणवाडी केंद्रासाठी अत्यावश्यक साधनाची जाणीव असणाऱ्या अंगणवाडी सेविकेच्या सल्ल्यानेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना
त्यांच्या उत्पन्नातील दहा टक्के
रक्कम आता खर्च करावी लागणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी परिपत्रकाव्दारे तसे आदेशच जारी केले आहेत. यामुळे सरपंच व ग्रामसेवकांच्या ‘अर्थ’पूर्ण मनमानीला आळा बसणार आहे.
अंगणवाडी केंद्रातील आवश्यक सोयीसुविधांसह बालकांच्या आवडीनिवडी, शाळेची गोडी लावण्यासाठी बालकाना हव्या असलेल्या वस्तूची जाणीव संबंधीत सरपंच किंवा ग्रामसेवकापेक्षा सेविकेला असते. यामुळे ग्रामपंचायतींना त्यांच्या सल्ल्यानुसारच खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे सरपंच व ग्रामसेवकांची चांगलीच गोची झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाव्दारे जिल्ह्यात सुमारे दोन हजार अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत या अंगणवाड्या सुरू असून त्यावर सुमारे दोन हजार सेविकांसह मदतनीस कार्यरत आहेत. मानधनावर कार्यरत असलेल्या या सेविकाना ग्रामपंचायतींच्या आर्थिक सल्लामसलतीमध्ये प्राधान्याने स्थान दिल्यामुळे त्यांना आता वेगळेच महत्त्व प्राप्त होणार आहे.