मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका झाल्या सज्ज

By मनोहर कुंभेजकर | Published: April 3, 2024 09:12 PM2024-04-03T21:12:57+5:302024-04-03T21:58:51+5:30

मतदान टक्केवारी कशी वाढवायची याकडे राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे.

Anganwadi workers are ready to increase voting percentage | मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका झाल्या सज्ज

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका झाल्या सज्ज

मुंबई-मुंबईत सोमवार दि,20 मे ला आगामी लोकसभेसाठी मतदान होत आहे.शनिवार,रविवार लागून आलेल्या सुट्या,त्यातच शाळा,महाविद्यालयांना असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्या यामुळे रेल्वे,एसटी यांचे हाऊस फूल रिझर्व्हेशन झाले आहे.त्यामुळे मुंबईकर आपल्या कुटुंबासह आपल्या गावी आणि मुंबई बाहेर देवदर्शन,पर्यटनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान टक्केवारी कशी वाढवायची याकडे राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाचे लक्ष लागले आहे.

टॉवर मध्ये, उचभ्रू वस्तीत राहणारे नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत असतात,त्यावेळी त्यांना लोकप्रतिनिधींची मदत लागते, मात्र मतदान करायला ते उत्साही नसतात.त्यामुळे विशेष करून उपनगरात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी 50 टक्यांपेक्षा कमी झाली त्याठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उपनगर जिल्हाधिकारी तथा उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविका सज्ज झाल्या आहेत. यावेळी अंगणवाडी सेविकांनी 2024 च्या निवडणुकीत 70 टक्के मतदान होण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.मुंबई महानगर पालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी यांनी लोकमतला ही माहिती दिली.

यासंदर्भात विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात
2019 ला झालेली मतदानाची कमी टक्केवारी लक्षात घेता हि टक्केवारी वाढवण्यासाठी सुभाष दळवी आणि 27,मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.यावेळी सुमारे 1000 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.अश्या प्रकारचे शिबीर चांदीवली,मानखुर्द या विधानसभा क्षेत्रात आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत एकूण 5221 अंगणवाड्या असून मुंबई शहरात 940 तर उपनगरात 4281 अशा अंगणवाडी सेविका आणि त्यांची प्रत्येकी एक मदतनीस अशा 10442 अंगणवाडी सेविका मुंबई मध्ये घरोघरी मतदानकरा असे मतदारांना आवाहन करणार आहेत.

यावेळी सदर कार्यक्रमात सह - आयुक्त (परिमंडळ -4)
 विश्वास शंकरवार,सुभाष दळवी, सुभाष काकडे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 164 वर्सोवा विधानसभा मतदार संघ, प्रिती पाटील, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 165 अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघ,  स्नेहलता स्वामी अंधेरी तहसीलदार 
शरद कुऱ्हाडे, तसेच 164 वर्सोवा व 165 अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे स्वीपचे पदाधिकारी उपस्थित होते.

एक अंगणवाडी सेविका आणि त्यांची मदतनीस अश्या दोघी 200 घरातील मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.घरोघरी मतदारांशी संपर्क साधून सर्व मतदारांना घटनेने दिलेला अधिकारी बजवावा असे आवाहन करतील.झोपडपट्टीत अधिक असलेल्या मतदार संघात देखिल या अंगणवाडी सेविका जाणार आहेत.अंगणवाडीतील लहान मुले आपल्या आई वडिलांना मतदान करण्यासाठी हट्ट धरतील आणि मतदान केल्यावर त्यांच्यासोबत सेल्फी काढतील. पालकांकडून मतदान करण्यासाठी " संकल्प पत्र " भरून घेतील. तसेच चौक सभा , पदयात्रा, स्वाक्षरी मोहीम आदी विविध उपक्रम राबवून मतदान करण्यासाठी जनजागृती करतील अशी माहिती दळवी यांनी दिली.

दरम्यान मतदार नोंदणी करण्यासाठी अजूनही मतदारांना संधी आहे.त्यांनी voters.eci.gov.in/ किंवा व्होटर हेल्प लाईन मोबाईल अँप/ मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहन उपनगर जिल्हाधिकारी तथा उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

Web Title: Anganwadi workers are ready to increase voting percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई