Join us  

अंगणवाडीसेविकांना खुशखबर, सरकारने निवृत्तीचे वय केलं ६५ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 6:17 AM

शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांना संधी; दोन लाख कर्मचाऱ्यांना फायदा

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. अंगणवाड्यांमध्ये काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कर्मचाºयांना ही संधी मिळेल. या निर्णयाचा फायदा दोन लाख कर्मचाऱ्यांना होऊ शकेल.

१ डिसेंबर, २०१८ रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडीसेविका-मदतनिसांची वैद्यकीय तपासणी करून, त्या काम करण्यास पात्र असल्याबाबतचे सक्षम वैद्यकीय अधिकाºयांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना मानधनावर सेवेत ठेवण्यात येणार आहे. ६० आणि ६३ वर्षे वय पूर्ण केल्यावर दोन वेळा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आदिवासी व ग्रामीण प्रकल्पांसाठी जिल्ह्याच्या शल्य चिकित्सकांचे, तसेच नागरी भागासाठी शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक किंवा वैद्यकीय मंडळ यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. सेविका-मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाºयांनी संबंधित शासकीय वैद्यकीय यंत्रणांना कळविल्यानंतर त्यांची आवश्यक तपासणी करून त्यांना विहित नमुन्यात प्रमाणपत्र देण्यात येईल.यांची मानधनी सेवा मर्यादा ६० वर्षेच१ नोव्हेंबर, २०१८ पासून नियुक्त अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीसेविका, तसेच अंगणवाड्यांच्या एकत्रीकरणानंतर मदतनिसाची अंगणवाडीसेविका म्हणून नेमणूक केल्यास त्यांची मानधनी सेवा मर्यादा ६० वर्षेच असेल.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रसरकार