अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका,सहाय्यकांचा गौरव

By Admin | Updated: December 15, 2014 22:47 IST2014-12-15T22:47:46+5:302014-12-15T22:47:46+5:30

जिल्हा परिषद ठाणे, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्ह्यांतील २२ अंगणवाडी सेविका व २२ मदतनीस यांच्यासह २२ बाल प्रकल्पांच्या पर्यवेक्षकांना अंगणवाडी

Anganwadi Supervisor, Servant, Assistant's Glory | अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका,सहाय्यकांचा गौरव

अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका,सहाय्यकांचा गौरव

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्ह्यांतील २२ अंगणवाडी सेविका व २२ मदतनीस यांच्यासह २२ बाल प्रकल्पांच्या पर्यवेक्षकांना अंगणवाडी आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. मंगळवारी ठाणे येथे हा
पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील गावपाड्यांमध्ये घरोघर जाऊन बालकांच्या सुदृढ आरोग्यासह त्यांच्यात शिक्षणाची ओढ निर्माण करण्यासह कुपोषित बालकांना सशक्त करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविकांना पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन येथील अण्णासाहेब वर्तक सभागृहात केले आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या नियंत्रणात पार पडणाऱ्या या पुरस्कार समारंभास विभागीय महिला व बालकल्याण आयुक्त विनिता वेद, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड, विजय सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, सुनील चव्हाण उपस्थित राहणार असल्याचे बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण भावसार यांनी लोकमतला सांगितले.
बाल कल्याण प्रकल्पांच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षक आदी ६६ जणांना अंगणवाडी आदर्श पुरस्कार देऊन सन्मानितकेले जात आहे. या पुरस्कारांमध्ये सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये मूल्याचे पोस्ट खात्याचे नॅशनल सेव्हिंग प्रमाणपत्र व साडी आदींचा समावेश राहणार आहे. याशिवाय २२ पर्यवेक्षकांना देण्यात येणाऱ्या आदर्श पुरस्कारांमध्ये प्रमाणपत्र, नारळ आणि साडीचा समावेश राहणार आहे. यामुळे त्यांच्या सेवावृत्तीचा मोठा गौरव होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Anganwadi Supervisor, Servant, Assistant's Glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.