...अन् प्रवासीच निघाला वाहनचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:22 IST2018-03-28T01:22:17+5:302018-03-28T01:22:17+5:30

काळाचौकी येथून शिवडीसाठीभाडे घेऊन टॅक्सीचालक निघाला.

... and the traveler left the car | ...अन् प्रवासीच निघाला वाहनचोर

...अन् प्रवासीच निघाला वाहनचोर

मुंबई : काळाचौकी येथून शिवडीसाठीभाडे घेऊन टॅक्सीचालक निघाला. प्रवाशाने शिवडी परिसरात गाडी थांबवली. आणि जवळच्या शॉपमधून दारु घेऊन येण्यास सांगितले. टॅक्सीचालक दारुच्या दुकानात जाताच प्रवासी टक्सीसह पसार झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अनोळखी प्रवाशाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

शिवडीच्या पारधीपाडा परिसरात टॅक्सीचालक लाल मोहम्मद पुत्तन अली मन्सुरी (४२) कुटुंबियांसोबत राहतात. रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास काळाचौकी पोस्ट आॅफिसजवळ एकाने हात दाखवून थांबविले. आणि शिवडीकडे नेण्यास सांगितले. प्रवाशाला घेऊन तो शिवडीच्या दिशेने निघाला. काळाचौकीच्या एका बियर शॉपजवळ त्याने यादवला टॅक्सी थांबविण्यास सांगितले. यादवला बियर घेऊन येण्यास सांगितले. यादव दुकानाकडे गेला असताना, इथे प्रवासी टॅक्सीसह पसार झाला. अखेर रात्री उशिराने गाडीचा काहीच शोध न लागल्याने यादवने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

त्याच्या तक्रारीवरुन काळाचौकी पोलिसांनी तपास सुरु केला. अनोळखी इसमाविरुद्ध वाहन चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच यादवने केलेल्या वर्णन, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ते आरोपीचा शोध घेत आहेत.  

Web Title: ... and the traveler left the car