...अन् लोकलचा अपघात टळला
By Admin | Updated: October 29, 2015 00:28 IST2015-10-29T00:28:52+5:302015-10-29T00:28:52+5:30
चर्चगेट स्थानकात लोकल बफरला धडकून मोठा अपघात होण्याच्या घटनेची पुनरावृत्ती बुधवारी दुपारच्या सुमारास सीएसटी स्थानकात होणार होती

...अन् लोकलचा अपघात टळला
मुंबई : चर्चगेट स्थानकात लोकल बफरला धडकून मोठा अपघात होण्याच्या घटनेची पुनरावृत्ती बुधवारी दुपारच्या सुमारास सीएसटी स्थानकात होणार होती. मात्र एडब्ल्यूएसमुळे (आॅक्झिलरी वॉर्निंग सिस्टीम - वेगमर्यादेवर नियंत्रण आणणारी यंत्रणा) लोकल थांबली आणि अनर्थ टळला.
कसाऱ्याहून सीएसटीला येणारी जलद लोकल दुपारी साडेबाराच्या सुमारास सीएसटीत प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर येताच प्लॅटफॉर्मवरील बफरपासून ६0 मीटर अंतरावर अचानक थांबली. लोकल प्लॅटफॉर्मवर अर्धवट थांबल्याने प्रवासीही चक्रावले. प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर उड्या टाकल्या. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले, सीएसटीत प्रवेश करताना लोकलचा वेग हा नियमानुसार ताशी ३0 किमी असला पाहिजे आणि प्रवेश केल्यानंतर तो ताशी १0 किमीपर्यंत आणला पाहिजे. या लोकलने वेगमर्यादा ओलांडल्याचे लक्षात येताच स्थानकातील एडब्ल्यूएस यंत्रणा कार्यान्वित झाली आणि लोकलचे आपत्कालीन ब्रेक लागले.