निसर्गरम्य ठिकाणी वसलेले प्राचीन तुंगारेश्वर शिवमंदिर
By Admin | Updated: July 28, 2014 00:03 IST2014-07-27T23:20:02+5:302014-07-28T00:03:54+5:30
श्रावणी सोमवार म्हटला की भक्तगणांचे पाय वळतात ते शिवमंदिराकडे.
निसर्गरम्य ठिकाणी वसलेले प्राचीन तुंगारेश्वर शिवमंदिर
वसई : श्रावणी सोमवार म्हटला की भक्तगणांचे पाय वळतात ते शिवमंदिराकडे. अखंड शिवनामाचा जप आणि सोबतच शिवाला अभिषेक करण्यासाठी वसईकर भक्त उद्या श्रावणी सोमवारनिमित्त निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या प्राचीन अशा तुंगारेश्वर येथील शिवमंदिराला आवर्जून जाणार आहेत. तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत २१३७ फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने म्हणून प्रसिध्द असून भाविकांना या ठिकाणी गेल्यावर आत्मिक समाधान लाभत असल्याने येथे गर्दी असते.
तुंगारेश्वरच्या डोंगरावर वसई पूर्व सातीवली गावाच्या परिसरात हे मंदिर आहे. हिरवाईने नटलेला परिसर, डोंगररांगा आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांची पाशर््वभूमी लाभल्याने प्रत्यक्षात शंकराच्या दर्शनालाच जात असल्याची भावना भक्तांमध्ये होते. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठीही भक्तगण आणि पर्यटक या ठिकाणाला अवश्य भेट देत असतात. उद्या पहिला श्रावणी सोमवार असल्याने भक्तांनी या जुन्या आणि प्रसिध्द मंदिराला प्रचंड गर्दी होत आहे, त्यामुळे वसईसह पालघर, डहाणूसह राज्यातून भाविक येतात.