अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर 954

By Admin | Updated: August 5, 2014 00:25 IST2014-08-05T00:25:28+5:302014-08-05T00:25:28+5:30

भारतातील भुमीज शैलीतील अत्यंत प्राचिन अशा मंदिरांपैकी एक मंदीर म्हणजे अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर.

Ancient Shiva Temple of Ambernath 954 | अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर 954

अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर 954

पंकज पाटील - अंबरनाथ
भारतातील भुमीज शैलीतील अत्यंत प्राचिन अशा मंदिरांपैकी एक मंदीर म्हणजे अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर. या मंदिरावर कोरलेले अनेक शिल्प आजही त्याच्या वैभाची साक्ष देत असून या मंदिराचा 954 वा वर्धापन दिन मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे.
शिलाहार घराण्यातील माम्वाणि राजाच्या काळात श्रवण शुध्द 9 शके 982 म्हणजेच 27 जुलै  1क्6क् मध्ये हे मंदिर पूर्ण झाले असून त्याची तारीख मंदिराच्या शिलालेखावर कोरलेली आहे. त्यानुसार या मंदिराचा वर्धापन दिन श्रवण शुध्द नवमीला साजरा होत असून यंदा 5 ऑगस्ट रोजी मंदिराचा 954 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मंदिर बांधण्यासाठी 35 ते 4क् वर्ष लागली आहेत़ भूमीज पध्दतीतील भारतांतील हे सर्वात जुने मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती झाल्यानंतर भारतात अशा प्रकारचे अनेक मंदिरे बांधण्यात आली़ संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ज्या 218 कला संपन्न वास्तू म्हणून युनेस्कोने  जाहिर केल्या आहेत, त्यात हे एक मंदीर आहे. ते अध्यात्मशक्तीचे उर्जास्त्रोत आहे. मुर्तितून तत्वज्ञान प्रकट करण्याची किमया या मंदिरात आहे. 
शिल्प शास्त्रप्रमाणो अंबरनाथचे शिवमंदिर हे सप्तांग भूमीज पध्दतीत मोडते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक असे सात भूमी(शिल्प रांगा) रचण्यात आले होते. मात्र कालांतराने गाभा:यावरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांगा) शिल्लक आहेत. 
नष्ट झालेल्या भूमीचे अवशेष मंदिराच्या परिसरात सापडतात. 
या मंदिराचा गाभारा 13 -13 
फूट चौरस आहे. या मंदिराच्या बाहेरील शिल्पांवर देवतांचे 
शिल्प कोरण्यात आले आहे. या मंदिरावर गरुडासन विष्णू, त्रिपुरावध मुर्ती, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची शोडशवर्षीय (सोळा वर्षाची)पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, लिंडोद्मव मुर्ती, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, मरकडेय कथेची मुर्ती, गणोश नृत्य मुर्ती, नृसिंह अवताराची मुर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे. 
मात्र त्यातील अनेक मुर्ती आज भग्ण अवस्थेत आहेत. काहींची झीज झाली आहेत. त्यांची देखरेख करण्याची गरज आहे. त्यांची योग्य निगा पुरातत्व खात्याने केल्यास हे मंदिर भावी पिडीसाठीही अभ्यासाचा विषय ठरेल. 

 

Web Title: Ancient Shiva Temple of Ambernath 954

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.