एशियाटिकमध्ये मिळणार आता प्राचीन इतिहासाचे धडे
By Admin | Updated: August 5, 2014 01:02 IST2014-08-05T01:02:15+5:302014-08-05T01:02:15+5:30
आताच्या पिढीला प्राचीन भारतीय संस्कृतीचे ज्ञान मिळावे, ही संस्कृती समजून घ्यावी, जतन करावी या उद्देशाने एशियाटिक लायब्ररीने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

एशियाटिकमध्ये मिळणार आता प्राचीन इतिहासाचे धडे
मुंबई : आताच्या पिढीला प्राचीन भारतीय संस्कृतीचे ज्ञान मिळावे, ही संस्कृती समजून घ्यावी, जतन करावी या उद्देशाने एशियाटिक लायब्ररीने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय वेद, रामायण, दशरथा जटाका, वर्ण या सगळ्यांचे धडे आता मुंबईकरांना घेता येतील. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे यंदापासून प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा पहिला पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे.
पां.वा. काणो इन्स्टिटय़ूटच्या मदतीने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, आपल्या 2क्8 वर्षाच्या गौरवशाली परंपरेत पहिल्यांदाच अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या वेळी विनय सहस्रबुद्धे, परिणीता देशपांडे, अरविंद जामखेडकर, सूरज पंडित, रूपाली मोकाशी हे मान्यवर उपस्थित होते.
या अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी बारावीर्पयतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. सप्टेंबरपासून सुरू होणारा हा अभ्यासक्रम एका वर्षासाठी असणार आहे. सोर्सेस फॉर कल्चरल स्टडी आणि फॅसेट ऑफ इंडियन कल्चर या दोन विभागांत अभ्यासक्रम शिकविला जाणार असून, यात अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. अभ्यासक्रमासाठी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. प्रत्येक आठवडय़ाच्या शनिवारी दुपारी 2.3क् ते 5.3क् या वेळेत या अभ्यासक्रमाचे वर्ग चालणार असल्याची माहिती परिणीता देशपांडे यांनी दिली. भारताचा इतिहास, प्राचीन भारतीय संस्कृती या सगळ्या बाबतीत सध्याच्या पिढीमध्ये जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून विजय रिकामे काम पाहत असून, अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)