Join us

अंबानी कुटुंबातील अनंत-राधिका विवाह सोहळ्यामुळे भारताचे नाव जागतिक नकाशावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:10 IST

आजच्या घडीला तंत्रज्ञान, विविध उद्योग, वित्तीय सेवा आदी क्षेत्रात भारताने आपला दमदार ठसा उमटवला आहे.

मुंबई : भारतीय समाजात लग्न होते ते केवळ दोन व्यक्तींचे नव्हे तर या निमित्ताने दोन कुटुंब त्यांच्या संस्कृती, परंपरेसह एकमेकांना जोडली जातात. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामुळे केवळ दोन श्रीमंत कुटुंबे एकमेकांना जोडली गेली नाहीत, तर या लग्नामुळे भारतीय परंपरेचे दर्शन अवघ्या जगाला झाले.

त्यांच्या लग्नाचा शाही सोहळा चर्चेत राहिला तो केवळ श्रीमंतीमुळे नाही. तर या निमित्ताने जगभरातील दिग्गजांना भारताची ताकद अनुभवता आली. भारताला जागतिक नकाशावर अधोरेखित करणाऱ्या व एक वर्ष पूर्ण झालेल्या या लग्न सोहळ्याची ही आगळी वेगळी गोष्ट.

अंबानी कुटुंबांचे लग्न म्हणजे जगभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला येणारच. पण लग्नाला उपस्थित दिग्गज मान्यवर केवळ अंबानींमुळेच आले असे नव्हे तर त्याला किनार होती ती विकसित भारताची. आजच्या घडीला तंत्रज्ञान, विविध उद्योग, वित्तीय सेवा आदी क्षेत्रात भारताने आपला दमदार ठसा उमटवला आहे. भारताने स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळेच जगभरातील विविध उद्योगांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित होते.

टॅग्स :अनंत अंबानीमुकेश अंबानी