अमरापूरकर यांची प्रकृती स्थिर
By Admin | Updated: October 28, 2014 01:44 IST2014-10-28T01:44:01+5:302014-10-28T01:44:01+5:30
ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती गेल्या तीन दिवसांपासून अत्यवस्थ असली तरी आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे.

अमरापूरकर यांची प्रकृती स्थिर
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती गेल्या तीन दिवसांपासून अत्यवस्थ असली तरी आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी त्यांना अंधेरीच्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोन आठवडय़ांपूर्वी त्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रस जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मधुमेह वाढल्यामुळे त्यांच्या फुप्फुसाला संसर्ग झालेला आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. श्वसन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत अजून सुधारणा झाली नसली तरी त्यांची प्रकृती स्थिर
आहे. (प्रतिनिधी)