अमिताभ बच्चन यांनी चार कार्यालये दिली भाड्याने; महिन्याचे भाडे २ कोटी

By मनोज गडनीस | Updated: December 30, 2023 16:37 IST2023-12-30T16:33:29+5:302023-12-30T16:37:51+5:30

ओशिवरा येथील कार्यालये दिली भाड्याने.

Amitabh Bachchan will get 2 crores for the rent of four offices in oshiwara mumbai | अमिताभ बच्चन यांनी चार कार्यालये दिली भाड्याने; महिन्याचे भाडे २ कोटी

अमिताभ बच्चन यांनी चार कार्यालये दिली भाड्याने; महिन्याचे भाडे २ कोटी

मनोज गडनीस,मुंबईबिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांची मुंबईतील ओशिवरा परिसरात असलेली चार कार्यालये भाडेतत्वावर दिली असून या भाड्यापोटी त्यांना वर्षाला २ कोटी ७ लाख रुपये मिळणार आहेत. अलीकडेच हा व्यवहार झाला असून वॉर्नर म्युझिक इंडिया लि. या कंपनीने ही कार्यालये भाडेतत्वावर घेतल्याची माहिती आहे.

ओशिवरा येथील या इमारतीमध्ये ही चार कार्यालये असून त्यांचे आकारमान १० हजार चौरस फूट इतके आहे. तर याचसोबत संबंधित भाडेकरू कंपनीला १२ पार्किंग स्लॉट देखील मिळणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, हा भाडेतत्वाचा करार पाच वर्षांसाठी झाला असून पहिल्या चार वर्षांकरिता वर्षाकाठी अमिताभ यांना २ कोटी ७ लाख रुपये भाडे मिळणार आहे. तर पाचव्या वर्षी भाड्याची रक्कम २ कोटी ३८ लाख रुपये असेल. या व्यवहारासाठी अमिताभ यांनी १ कोटी ३ लाख रुपये डिपॉझिटपोटी घेतल्याचीही माहिती आहे. या व्यवहारासाठी २ लाख ८८ हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. या कार्यालयांची खरेदी अमिताभ यांनी २८ कोटी ७२ लाख रुपयांना केली आहे. याच इमारतीमध्ये कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, सारा अली खान यांच्या देखील मालकीची कार्यालये आहेत.

Web Title: Amitabh Bachchan will get 2 crores for the rent of four offices in oshiwara mumbai