Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या मनधरणीसाठी अमित शहा आज ‘मातोश्री’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 06:27 IST

देशातील सर्व विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात एकत्र येत असल्यामुळे भाजपाला आता जुन्या मित्रांची आठवण आली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार आहेत.

मुंबई : देशातील सर्व विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात एकत्र येत असल्यामुळे भाजपाला आता जुन्या मित्रांची आठवण आली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार आहेत.भाजपा २०१४ मध्ये सत्तेमध्येआल्यापासून शिवसेनेशी एकही दिवस चांगले संबंध राहिले नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शिवसेना सहभागीअसली तरी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर सातत्याने सडकून टीका होत आली आहे. या पार्श्वभूमीवरदोन पक्षांमधील कटुता दूर करण्याचाप्रयत्न शहा उद्याच्या भेटीत करतील, असे मानले जात आहे.पुढील वर्षीच्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा शिवसेना सातत्याने करीत असताना भाजपाने मात्र युतीचा हात पुढे केला आहे. उद्याच्या भेटीतही अमित शहा मैत्रीचा हात पुढे करतील, असे दिसते.भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, २६ मे ते ११ जून दरम्यान समाजातील नामवंत मंडळींना भेटण्यासाठी पक्षाने संपर्क अभियान हाती घेतले आहे. त्याचा भाग म्हणून मित्रपक्षांचे नेते आणि समाजातीलमान्यवर लोकांना अमित शहांसह अन्यनेते भेटत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून बुधवारची ‘मातोश्री’वरील भेट असेल. याअंतर्गत शहा यांनी आधीच बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांची भेट घेतली होती. गुरुवारी ते अकाली दलाच्या नेत्यांनाभेटणार आहेत.रतन टाटा, माधुरी दीक्षित लतादीदींनाही भेटणारप्रख्यात उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनाही अमित शहा उद्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटणार आहेत. भाजपाच्या संपर्क अभियानाचा हा भाग आहे.

टॅग्स :अमित शाहमुंबई