मुंबईत आमीरचे पंतप्रधान मोदींसोबत डिनर ?

By Admin | Updated: February 14, 2016 11:04 IST2016-02-14T11:04:04+5:302016-02-14T11:04:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असल्याने रात्री भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात अभिनेता आमीर खान सहभागी झाल्याची चर्चा आहे.

Amir's dinner with PM Modi in Mumbai? | मुंबईत आमीरचे पंतप्रधान मोदींसोबत डिनर ?

मुंबईत आमीरचे पंतप्रधान मोदींसोबत डिनर ?

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १४ - महाराष्ट्र सरकारच्या 'मेक इन इंडिया' सप्ताहाचे उदघाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असल्याने रात्री भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
या कार्यक्रमात अभिनेता आमीर खान सहभागी झाल्याची चर्चा आहे. आमीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डिनर घेतल्याचे वृत्त आहे. या रात्री भोजनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात आमीरही होता. मागच्यावर्षी एका कार्यक्रमात असहिष्णूतेवरुन आमीरने वादग्रस्त वक्तव्य करुन सत्ताधारी भाजपचा रोष ओढवून घेतला होता. त्यानंतर आमीरला सरकारी जाहीरातींमधून डच्चू देण्यात आला होता. 
आमीरच्या त्या विधानामुळे पंतप्रधान मोदी आणि आमीरचे संबंध बिघडल्याची चर्चा होती. आमीरची या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत चर्चा झाली का ? ते समजू शकलेले नाही. देशातील वाढत्या असहिष्णूतेमुळे पत्नी किरणच्या मनात देश सोडून जाण्याचा विचार आला होता असे विधान आमीरने केले होते. 

Web Title: Amir's dinner with PM Modi in Mumbai?