रविवारी मेगाब्लॉक घेऊन आंबिवलीचा पूल जमीनदोस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 04:46 IST2020-06-22T04:46:11+5:302020-06-22T04:46:19+5:30

मध्य रेल्वेमार्गावरील कोणत्याही लोकल फेरीवर परिणाम झाला नाही. यासह पश्चिम रेल्वेमार्गावर कोणताही मेगाब्लॉक न घेता सर्व लोकल फेऱ्या धावल्या.

Ambivali's bridge was demolished on Sunday with a megablock | रविवारी मेगाब्लॉक घेऊन आंबिवलीचा पूल जमीनदोस्त 

रविवारी मेगाब्लॉक घेऊन आंबिवलीचा पूल जमीनदोस्त 

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेऊन आंबिवली रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल जमीनदोस्त करण्यात आला. मात्र मध्य रेल्वेमार्गावरील कोणत्याही लोकल फेरीवर परिणाम झाला नाही. यासह पश्चिम रेल्वेमार्गावर कोणताही मेगाब्लॉक न घेता सर्व लोकल फेऱ्या धावल्या.
मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर १५ जूनपासून राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल सुरू झाली आहे. रेल्वे प्रशासन रविवारी मेगाब्लॉक घेऊन पायाभूत कामे करतात. त्यामुळे जादा लोकल फेºया असल्याने लोकल फेºया विस्कळीत होतात. मध्य रेल्वेच्या २०० आणि पश्चिम रेल्वेच्या १६२ फेºया आहेत.

Web Title: Ambivali's bridge was demolished on Sunday with a megablock