महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले
By Admin | Updated: November 9, 2014 00:30 IST2014-11-09T00:30:18+5:302014-11-09T00:30:18+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास एक वर्षापासून अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. अस्थिर प्रशासनामुळे विकास कामांना फटका बसला आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले
नामदेव मोरे - नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास एक वर्षापासून अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. अस्थिर प्रशासनामुळे विकास कामांना फटका बसला आहे. यात अत्याधुनिक आवक व जावक गेट, फळ मार्केटमधील नवीन इमारत, धान्य व मसाला मार्केटमधील काँक्रेटीकरणाचे काम ठप्प आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. पणन मंत्र्यांनी येथील संचालक मंडळ बरखास्त केल्याच्या शक्यतेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाविषयी नाराजीचा सुर उमटत आहे. मार्केटमध्ये अत्याधुनिक आवक व जावक गेट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजी व फळ मार्केटमध्ये काम सुरू करण्यात आले. सदर ठेकेदाराच्या कामाची वाढीव मुदतही फेब्रुवारी 2क्14 मध्ये संपली. परंतु अद्याप गेट तयार झालेली नाहीत. या गेटवर संगणकीय कक्ष, सुरक्षा रक्षक चौकी व इतर सुविधा असणार आहेत. परंतु सदर काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या गेटवरील आतापर्यमत करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
फळ मार्केटमध्ये बिगर गाळाधारक व्यापा:यांसाठी नवीन मार्केट बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ओपन शेडच्या जागेवर सदर इमारतीचे काम सुरू केले. परंतु यानंतर वाढीव मजल्यांसाठी सुधारीत परवानगी मिळावी यासाठी महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान संचालक मंडळाच्या मुदतवाढीविरोधात व्यापारी संघटनेने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जव केल्यामुळे इमारतीचे काम सद्यस्थितीमध्ये ठप्प झाले आहे.
च्बाजारसमिती संचालक मंडळाची मुदत डिसेंबर 2क्13 मध्ये संपली . यानंतर शासनाने निवडणूका न घेता विद्यमान संचालक मंडळास सहा महिन्याची मुदतवाढ दिली. परंतु न्यायालयाने संचालक मंडळास धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. यामुळे जवळपास वर्षभरापासून अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे.
च्गेट, नवीन इमारत व रस्त्यांच्या कामावर योग्यप्रकारे देखभाल करण्यात आलेली नाही. देखभाल शाखेचे अधिकारीही काम करून घेण्यात अपयशी ठरले असून यामुळेही प्रकल्प अर्धवट राहिले असल्याची टिका होऊ लागली आहे. नवीन संचालक मंडळ आल्यानंतरच हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.
च्मसाला व धान्य मार्केटमध्ये रोडचे काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. मात्र दोन्ही मार्केटमधील रोडचे काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. काही ठिकाणी अर्धवट कामामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. परंतु ठेकेदाराने आर्थिक क्षमता नसल्याचे कारण सांगून काम थांबविले आहे.
च्अर्धवट राहिलेल्या कामांमुळे एपीएमसीचा आतार्पयतचा खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यमान संचालक मंडळाने एकही महत्वकांक्षी प्रकल्प पूर्ण केला नसल्याची टिका होऊ लागली आहे. त्यामुळे बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून तत्काळ निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे.