Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा अंधारे 'सुपारीबाज', त्या आंबेडकरी विचारांच्या नाहीत; या नेत्याने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 16:21 IST

सुषमी अंधारे यांनी कधीही आंबेडकरी चळवळीत काम केलेले नाही. आम्ही आंदोलनात जेलमध्ये गेलो, अंधारे या सुपारी बाज आहेत.

सुषमी अंधारे यांनी कधीही आंबेडकरी चळवळीत काम केलेले नाही. आम्ही आंदोलनात जेलमध्ये गेलो, अंधारे या सुपारी बाज आहेत. त्या सुपारी घऊन आंबेडकरांच्यावर बोलतात, असा आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते बाबुराव पोटभरे यांनी केला. आज बीड येथे पत्रकार परिषद घेऊन पोटभरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आरोप केले. 

"सुषमा अंधारे यांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चांगला अभ्यास असेल पण, त्यांनी राज्यात पैसे घेऊन भाषण केले आहेत.त्या उत्तम अभिनय करतात. त्यांनी काल रडल्याचा अभिनय चांगला केला. त्यांचे आनंदाचे अश्रू नाहीत तर दु:खाचे अश्रू आहेत. काल  संजय राऊत यांची सुटका झाली तेव्हा त्यांच्या आई आणि बायको यांना अश्रू आले नाहीत पण यांना रडू आले, हे सर्व त्यांचे नाटक आहे, असंही  बाबुराव पोटभरे म्हणाले. 

नेत्यांनी शांत रहायच आणि इतरांना...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

"सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रभर बाबासाहेब सांगितले, पण त्यांनी ही सर्व भाषणे ४०-४० हजार रुपये पैसे घेऊन केली आहेत. त्यामुळे त्या चांगल्या सुपारी बाज आहेत. त्यांनी आंबेडकरी चळवळीत कदीच काम केलेले नाही, असंही पोटभरे म्हणाले.  

काल खासदार संजय राऊत यांना १०० दिवसानंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर राज्यभरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जल्लोष केला. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या डोळ्यावर आनंद आश्रू आले. यावरुन आता त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

टॅग्स :सुषमा अंधारेशिवसेना