नवसाला पावणारी भिसेगावची अंबे भवानी
By Admin | Updated: September 29, 2014 22:40 IST2014-09-29T22:40:52+5:302014-09-29T22:40:52+5:30
कर्जत नगरपरिषद क्षेत्नातील पश्चिम भागात असलेल्या भिसेगाव येथील निसर्गरम्य परिसरात रेल्वे स्टेशन आणि एस.टी. स्टँडपासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्री अंबे भवानीचे भव्य मंदिर उभे आहे.

नवसाला पावणारी भिसेगावची अंबे भवानी
> कर्जत : कर्जत नगरपरिषद क्षेत्नातील पश्चिम भागात असलेल्या भिसेगाव येथील निसर्गरम्य परिसरात रेल्वे स्टेशन आणि एस.टी. स्टँडपासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्री अंबे भवानीचे भव्य मंदिर उभे आहे. अत्यंत जागृत व नवसाला पावणारी श्री अंबे भवानी माता भक्तांच्या हाकेला धावून जाते, याची अनेकांना प्रचिती आली आहे.
भिसेगाव हे ठिकाण भिसे खिंडीच्या पायथ्याशी आहे. पूर्वी या ठिकाणी खूप जंगल होते. व्यापारी वर्ग व्यापारासाठी मुंबई- पुणो मार्गाकडे जाताना या खिंडीच्या मार्गाने जात. हे व्यापारी खिंडीजवळ असणा:या विहिरीजवळ रात्नी मुक्काम करून सकाळी प्रवासाला निघत. वरती डोंगर माथ्यावर आदिवासी लोकांची वस्ती होती. एके दिवशी एका गुजराती व्यापा:याला मुक्कामी असताना स्वप्न पडले. स्वप्नात देवीने त्यास दर्शन दिले आणि मी या विहिरीजवळ असणा:या वारु ळात आहे. मला बाहेर काढ, माङया सोबतीला एक काळा नाग आहे. तो तुम्हाला काही करणार नाही.या स्वप्नाकडे त्याने लक्ष न देता तो व्यापारी व्यापार करण्यासाठी पुढे निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी तो व्यापारी मुक्कामास आला असता तसाच दृष्टांत त्याला झाला. हा सर्व वृत्तांत त्याने आपल्या व्यापारी मित्नांना सांगितला.या सर्व व्यापा:यांनी मिळून सत्य शोधण्याचे ठरविले. डोंगर माथ्यावरील आदिवासींना मदतीला बोलावून घेतले, सर्वजण वारु ळ फोडण्यासाठी जमले असताना त्या वारु ळातून एक काळा नाग आपोआप बाहेर निघून गेला. आदिवासी लोकांनी वारूळ फोडले तो काय आश्चर्य ! खरोखरच देवीची सुंदर रेखीव मूर्ती त्यातून बाहेर पडली, ती मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला.
आदिवासी व व्यापारी यांनी सावली म्हणून देवीच्या डोक्यावर छप्पर तयार केले. तेव्हापासून व्यापारी येता - जाता देवीची पूजा करून, देवीचे दर्शन घेऊनच पुढे जात असत. ही देवी कोणती? असे कुतूहल लोकांमध्ये निर्माण झाले. तेव्हा ज्या आदिवासी माणसाने वारु ळात प्रथम हात लावला, त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितले की, मी आबूच्या पहाडावरील श्री अंबे भवानी आहे. तेव्हापासून या देवीला श्री अंबे भवानी माता असे लोक म्हणू लागले.
कार्लेखिंडीतील जागृत पात्रुबाई देवी देवस्थान
4कार्लेखिंड : पेण-अलिबाग मार्गावरील कार्लेखिंडीच्या डोंगर माथ्यावर पात्रुबाई देवीचे स्थान हे अत्यंत निसर्गरम्य अशा वातावरणात आहे. एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून हे स्थळ सर्वपरिचित आहे. या पुरातन देवस्थानाचा शोध याच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गोठेघर या गावातील गुराख्याला लागला. सुमारे 75 वर्षापूर्वी देवीची ही पाषाणमूर्ती डोंगरावरच्या पाला-पाचोळ्य़ात सापडली.
4ग्रामस्थांनी तिचे नामकरण ‘पात्रुबाई’ असे केले आणि तेच पुढे सर्वपरिचित झाले, अशी माहिती गोठेघर गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दामोदर विठू पाटील यांनी दिली.
4पूर्वी साधे घुमट बांधण्यात आले. जसजसे या ठिकाणचे महत्त्व लोकांना कळले, तसतसे पंचक्रोशीतील दानशूर लोकांनी वस्तू आणि आर्थिक स्वरुपात मदत केली आणि आता सुशोभित मंदिर व बाजूला समाजमंदिर उभे केले. हे ठिकाण वनखात्याच्या हद्दीत जरी असले तरी सन 1975 पासून देवीची पूजाअर्चा करण्याचा अधिकार गोठघर गावातील चोवीस कुटुंबांकडे आहे.
4 प्रत्येक कुटुंबाला एका महिन्याचा कालावधी असतो आणि त्या महिन्यात मिळालेले उत्पन्न त्या कुटुंबाला दिले जाते. o्रावण आणि नवरात्रौत्सवात भाविकांची दर्शनासाठी येथे खूप गर्दी असते. या उत्सवांमध्ये भाविक एकत्र येऊन महाप्रसाद करतात. देवीची गाणी व नाच अशा स्वरूपात देवीचे अखंड जागरण केले जाते.
4मंदिरासमोरील रस्त्याने जाताना प्रत्येक माणूस देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. हजारो भाविक पात्रुबाई देवीचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात, असा विश्वास आहे.