अंबरनाथमध्ये सर्वच पक्षांना विजयाची समान संधी

By Admin | Updated: October 4, 2014 22:56 IST2014-10-04T22:56:04+5:302014-10-04T22:56:04+5:30

आघाडी आणि युती तुटल्याने अंबरनाथ विधानसभा मतदार संघ शिवसेनेसाठी सोपा राहिलेला नाही. मत विभागणीचा फटका ज्या प्रमाणो सेनेला बसणार आहे

In Ambarnath, all parties have the same opportunity to win | अंबरनाथमध्ये सर्वच पक्षांना विजयाची समान संधी

अंबरनाथमध्ये सर्वच पक्षांना विजयाची समान संधी

>पंकज पाटील ल्ल अंबरनाथ
आघाडी आणि युती तुटल्याने अंबरनाथ विधानसभा मतदार संघ शिवसेनेसाठी सोपा राहिलेला नाही. मत विभागणीचा फटका ज्या प्रमाणो सेनेला बसणार आहे तसाच फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसणार आहे. दुसरीकडे अंबरनाथमध्ये अस्तित्व टिकविण्यासाठी झटणा:या भाजपाला आपला उमेदवार मिळाल्याने पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना नवसंजीवनी मिळाली आहे. तर गेल्या निवडणुकीत उमेदवार न देणा-या मनसेने या निवडणुकीत उमेदवार देत नशिब अजमाविण्याचा प्रय} सुरु केला आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये पंचरंगी लढत निश्चित असुन सर्वच पक्षांना विजयाची समान संधी आहे. 
या विधानसभा निवडणूकीत परिस्थिती बदलली असुन शिवसेनेतर्फे पुन्हा बालाजी किणीकर तर राष्ट्रवादीतर्फे महेश तपासे हे रिंगणात उतरले आहे. युती आणि आघाडी तुटल्याने भाजपा -रिपाई युतीतर्फे राजेश वानखेडे (रिपाई कोटय़ातून) यांना तर काँग्रेसतर्फे कमलाकर सुर्यवंशी (पीपल्स रिब्लीकन पार्टी कोटय़ातून) यांना उमेदवारी देण्यात आली. वानखेडे हे जरी रिपाईच्या कोटय़ातुन लढवित असले तरी त्यांना भाजपाने आपले चिन्ह दिले आहे. तर सूर्यवंशी हे पी.आर.पीच्या कोटय़ातुन निवडणूक लढवित असले तरी चिन्ह मात्र काँग्रेसचे देण्यात आले आहे. या चार उमेदवारांसोबतच मनसेने डॉ.विकास कांबळे यांना उमेदवारी देत लढत पंचरंगी करण्याचा पूर्ण प्रय} केला आहे. या पाच प्रमुख पक्षांसोबतच रिपाई सेक्युलरतर्फे शाम गायकवाड हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे दलित मतांवर डोळा ठेऊन मते मागणा-या उमेदवारांना यंदा 
इतर समाजाच्या मतांवरच आपले भवितव्य घडविण्याची वेळ आली आहे. सेनेचे किणीकर यांनी मतदार संघात ठोस विकास कामे केली नसली तरी मतदारांसी असलेला संपर्क त्यांना या निवडणुकीत तारणार आहे. राष्ट्रवादीचे महेश तपासे हे गेल्या निवडणूकीत पराभूत झालेले असतांनाही ते गेली पाच वर्ष मतदारांच्या संपर्कात राहिल्याने त्याचा फायदा ते घेण्याचा प्रय} करित आहेत. भाजपा रिपाई युतीचे वानखेडे हे भाजापच्या लाटेत स्वार होण्याचा प्रय} करित आहेत. तर  मनसेचे डॉ. कांबळे हे राज ठाकरे यांच्या विचारांवर मते मागण्यात व्यस्त आहेत. तर काँग्रेस- पी.आर.पी आघाडीचे सुर्यवंशी हे गेल्या निवडणूकीतल आपली मते अवाधीत ठेवत काँग्रेसची मते कॅश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येथे प्रमुख पाच पक्षांना विजयाची समान संधी उपलब्ध आहे. 
 
गेल्या विधानसभा निवडणूकीत अंबरनाथ मतदार संघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक आमदार किसन कथोरे यांना अंबरनाथ मतदार संघातुन निवडणूक लढविता आली नाही. आरक्षणामुळे शिवसेनेतील बडय़ा स्थानिक पुढा-यांना बाजुला सारत डॉ. बालाजी किणीकर यांनी उमेदवारी मिळवली होती. युतीच्या माध्यामातुन किणीकर यांची सरळ लढत ही राष्ट्रवादीचे(आघाडीचे) उमेदवार महेश तपासे यांच्या सोबत होती. गेल्या निवडणूकीत किणीकर यांना 5क् हजार 47क् मते मिळाली तर महेश तपासे यांना 3क् हजार 491 मतांवर समाधान मानावे लागले होते. तब्बल 19 हजार 979 मतांच्या फरकाने तपासे यांचा पराभव झाला होता. गेल्या निवडणूकीत आरपीआय (आ) गटातर्फे शाम गायकवाड यांनी निवडणूक लढवित तब्बल 17 हजार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर कमलाकर सुर्यवंशी यांनी 9 हजार मते घेत युतीच्या उमेदवाराला विजयात हातभार लाऊन दिला. तसेच मनसेने उमेदवार न दिल्याने युतीचा विजय सहज झाला.

Web Title: In Ambarnath, all parties have the same opportunity to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.