Join us  

दररोज दोन हजार रुग्ण वाढले तरी खाटांची चिंता नाही; मुंबई पालिका आयुक्तांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 2:10 AM

आणखी काही दिवस धोक्याचे

मुंबई : सध्या मुंबईत दररोज सरासरी १७०० ते १९०० कोरोना रुग्ण सापडत आहेत. पालिका रुग्णालय, जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये ११ हजार खाटा रिक्त असल्याने रोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली तरी खाटांची कमतरता नाही, असा दिलासा मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी दिला.

सणांच्या काळात तीन आठवड्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. वाढलेल्या भेटीगाठीत आवश्यक खबरदारी घेतली गेली नसल्याने आणखी काही दिवस रुग्णवाढ होईल, असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दररोजच्या चाचण्यांची संख्या १२ हजारांवर गेल्याने रुग्णसंख्येत वाढ झाल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. यापैकी ६० ते ७० टक्के पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना केवळ होम क्वारंटाइन होण्याची गरज आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई महानगरपालिका