मराठा समाजातील ७३९ तरुणांनाही सेवेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST2021-02-05T04:30:18+5:302021-02-05T04:30:18+5:30

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी मराठा समाजातील ७३९ तरुणांची लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पूर्ण झाली ...

Also recruit 739 youth from the Maratha community | मराठा समाजातील ७३९ तरुणांनाही सेवेत घ्या

मराठा समाजातील ७३९ तरुणांनाही सेवेत घ्या

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी मराठा समाजातील ७३९ तरुणांची लोकसेवा आयोगाकडून निवड प्रक्रिया पूर्ण झाली असताना त्यांना शासन सेवेत का नियुक्ती दिली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी अन्य समाजातील उमेदवारांप्रमाणे या मराठा तरुणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली.

मराठा समाजातील तरुण आपल्या मागण्यांंकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात बारा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. आशिष शेलार यांनी रविवारी या तरुणांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी लोकसेवा आयोगाने परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या या ७३९ उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून प्रक्रिया पूर्ण केली होती, तर मग त्यांना नियुक्ती का दिली जात नाही, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. याच काळात छाननी झालेल्या काही उमेदवारांना अन्य खात्यांत नियुक्ती दिल्या गेल्याचे समजते, मग या ७३९ तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करीत आहे, अन्य समाजाला जसा शासनाने न्याय दिला तसाच न्याय मराठा समाजातील तरुणांना द्यावा. कुणावरही अन्याय होणार नाही अशी समान न्यायाची भूमिका शासनाने घ्यावी, अशी मागणी शेलार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, या तरुणांचे निवेदन स्वीकारून त्याबद्दल शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Also recruit 739 youth from the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.