वर्गणीआधी हवी परवानगी

By Admin | Updated: July 15, 2015 02:39 IST2015-07-15T02:39:13+5:302015-07-15T02:39:13+5:30

सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्याआधी त्यासाठीची धर्मादाय आयुक्तांची लेखी परवागनी घेणे मंडळांना सक्तीची असल्याचा आदेश धर्मादाय

Allow collection beforehand | वर्गणीआधी हवी परवानगी

वर्गणीआधी हवी परवानगी

- स्रेहा मोरे,  मुंबई
सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्याआधी त्यासाठीची धर्मादाय आयुक्तांची लेखी परवागनी घेणे मंडळांना सक्तीची असल्याचा आदेश धर्मादाय आयुक्तालयाकडून जारी करण्यात आला आहे. विनापरवानगी वर्गणी गोळा करणाऱ्यांना १० हजारांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ज्या उद्देशासाठी वर्गणी गोळा करण्यात येणार आहे, तो उद्देश सफल होणेही बंधनकारक करण्यात आले आहे, असेही आयुक्तालयाने बजावले आहे. त्यामुळे उत्सव मंडळांना
गोळा झालेल्या वर्गणीचा सर्व तपशील आयुक्तांपुढे मांडावा लागणार आहे.
उत्सवांसाठी व नैसर्गिक आपत्तीसाठी वर्गणी गोळा करणाऱ्यांना चाप लावत उच्च न्यायालयाने यासाठी निर्बंध घालण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आयुक्तालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्याअंतर्गत अधिकृत नोंदणी असलेल्या संस्था व मंडळांना हा नियम बंधनकारक असेल.
कोणत्याही अशासकीय संस्था (एनजीओ) सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेव्यतिरिक्त इतर खासगी संस्था, व्यक्ती यांच्यामार्फत वर्गणी गोळा करणे तसेच त्याचा वापर करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधी व न्याय विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात वर्गणी गोळा करताना छापील पावत्या देणे, खर्चाचे व्हाऊचर्स ठेवणे आवश्यक आहे. शिवाय वर्गणी अथवा देणगी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याचे सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षण करून घेणेही सक्तीचे आहे. (प्रतिनिधी)

धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० मधील क्रमांक ६७ नुसार १० हजारांपर्यंत दंडाची शिक्षाही करण्यात येणार आहे.

Web Title: Allow collection beforehand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.