राज्यभरात आघाडी शक्य, पण मुंबईत अशक्य - संजय निरुपम
By Admin | Updated: January 13, 2017 15:46 IST2017-01-13T15:46:02+5:302017-01-13T15:46:02+5:30
आमचं वेगळं लढायचं ठरलं असून राष्ट्रवादीचीही तीच भूमिका आहे असंही संजय निरुपम यांनी सांगितलं आहे

राज्यभरात आघाडी शक्य, पण मुंबईत अशक्य - संजय निरुपम
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मुंबईत आघाडी अशक्य असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम बोलले आहेत. आमचं वेगळं लढायचं ठरलं असून राष्ट्रवादीचीही तीच भूमिका आहे असंही संजय निरुपम यांनी सांगितलं आहे. आघाडी होऊ नये याबाबत मुंबईच्या नेते-कार्यकर्त्यांची भूमिका ठाम असल्याचं निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केलं.
‘राज्यभरात आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य आहे. आमचं वेगळं लढायचं ठरलं आहे, मुंबईत राष्ट्रवादीचीही तीच भूमिका असल्यानेच त्यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.’ असं म्हणत निरुपम यांनी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.