परीक्षा नियंत्रकपदासाठीचे सर्व उमेदवार झाले ‘नापास’
By Admin | Updated: May 10, 2016 02:59 IST2016-05-10T02:59:43+5:302016-05-10T02:59:43+5:30
विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्याची धुरा परीक्षा नियंत्रकावर असते. विद्यापीठातर्फे परीक्षा नियंत्रक पदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मात्र सारेच उमेदवार ‘नापास’ ठरले आहेत.

परीक्षा नियंत्रकपदासाठीचे सर्व उमेदवार झाले ‘नापास’
मुंबई : विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्याची धुरा परीक्षा नियंत्रकावर असते. विद्यापीठातर्फे परीक्षा नियंत्रक पदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मात्र सारेच उमेदवार ‘नापास’ ठरले आहेत.
मुंबई विद्यापीठातर्फे ९ मे रोजी परीक्षा नियंत्रक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या पदासाठी एकूण २४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. पण या मुलाखतीतून एकाही उमेदवाराची निवड होऊ शकली नाही. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदासाठी ७, ८ आॅक्टोबर २०१५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली
होती. एकूण उमेदवारांपैकी छाननी समितीने चार नावांची शिफारस निवड समितीला केली होती.
पण अंतिम मुलाखतीत निवड समितीने परीक्षा नियंत्रक पदासाठी कोणत्याही नावाची शिफारस केली
नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बनसोड यांनी दिली. (प्रतिनिधी)