मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्यासह सर्व आरोपींना खटल्यासाठी आठवड्यातून एकदा न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश विशेष न्यायालयाने गुरुवारी दिला.प्रज्ञासिंह ठाकूरबरोबर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हासुद्धा या केसमध्ये मुख्य आरोपी आहे. सर्व आरोपी खटल्यादरम्यान अनुपस्थित असल्याने विशेष एनआयए न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत आरोपींनी किमान आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहावे, असे म्हटले. खटल्याची पुढील सुनावणी २० मे रोजी ठेवली आहे.मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी हेही मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असून, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
प्रज्ञासिंहसह सर्व आरोपी हाजीर हो! मालेगाव बॉम्बस्फोट खटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 04:54 IST