Join us

फटाक्यांमुळे प्रदूषणाची धोक्याची घंटा! मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 11:48 IST

उपाय म्हणून सर्वच यंत्रणांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करा, असे आवाहन हवामान खात्याकडूनही करण्यात आले आहे. 

मुंबई-

तब्बल तीन आठवड्यांहून अधिक काळ मुंबईवर घोंगावणारे प्रदूषण पावसामुळे आता किंचित कमी झाले असले तरी दिवाळीत वाजविल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे मुंबईकरांना प्रदूषणाचा त्रास होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावर उपाय म्हणून सर्वच यंत्रणांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करा, असे आवाहन हवामान खात्याकडूनही करण्यात आले आहे. 

महापालिकेसह एमएमआरडी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडलाने प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावले कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रदूषण वाढले तर त्याचा त्रास पुन्हा लहान मुले, वयोवृद्ध नागरिक यांना होईल. त्यामुळे त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातून करण्यात आले आहे. 

प्रदूषणाचे स्रोत वाढलेली बांधकामे, त्यातून उत्सर्जित होणारे धूलिकण, प्रदूषणकारी उद्योग, त्यातून उत्सर्जित होणारे धूळ आणि वायू प्रदूषण, कचरा, डम्पिंग ग्राउंड

श्वसनाचे आजार बळावतात- फटाक्यांच्या धुरामुळे हवेतील कण वाढतात. - हवेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला डोळा, नाक आणि घसा संबंधी समस्या होण्याची शक्यता असते.

तांबे- फटाक्यात रंगासाठी, आवाजासाठी रासायनिक पदार्थ वापरली जातात. त्यातील तांबे श्वसनमार्गाला त्रासदायक ठरते. 

कॅडमियम- कॅडमियम हे रक्तातील ऑक्सिजन वाहन नेण्याची क्षमता कमी असते. 

झिंक- झिंक उलट्या आणि तापास कारणीभूत आहेत. 

शिसे- शिसे मज्जासंस्थेवर परिणाम करते. 

मॅग्नेशियम- मॅग्नेशियमच्या धुराने नाक आणि श्वसनास त्रास होतो. 

काय करता येईल?- खराब ते अत्यंत खराब हवा असेल तर सकाळी, सायंकाळी चालणे, धावणे, जॉगिंग आणि शारीरिक व्यायाम टाळा. - सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत खिडक्या आणि दरवाजे उघडू नका, गरज पडल्यास दुपारी १२ ते चार या वेळेत बाहेर पडा. - वाहत्या पाण्याने डोळे धूत राहा आणि कोमट पाण्याने नियमित गुळण्या करा. 

थंडीची चाहूलयेत्या काळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात मात्र कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही. १७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागू शकते. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

टॅग्स :मुंबई