गोपीनाथ मुंडेंबाबत अजित पवारांचा मोठा खुलासा

By Admin | Updated: February 7, 2017 18:39 IST2017-02-07T15:15:09+5:302017-02-07T18:39:20+5:30

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबर नाही, पवारांचं वलय पाहून तारीख त्यांनी ठरवली असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केला आहे

Ajit Pawar's big disclosure about Gopinath Munde | गोपीनाथ मुंडेंबाबत अजित पवारांचा मोठा खुलासा

गोपीनाथ मुंडेंबाबत अजित पवारांचा मोठा खुलासा

>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 7 -  गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबर नाही, पवारांचं वलय पाहून तारीख त्यांनी ठरवली असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केला आहे. 'गोपीनाथ मुंडेंना आपला मूळ वाढदिवस माहित नव्हता, अशी माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिली', असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे. एबीपी माझा कट्टावर बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 
 
इतकंच नाही तर गोपीनाथ मुंडे पंकजा आणि चार आमदारांसोबत भाजपा सोडण्याच्या तयारीत होते असाही गौप्यस्फोट अजित पवारांनी यावेळी केला. 'गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या विचारात होते, मात्र सुषमा स्वराज यांनी थांबवलं', असं अजित पवार बोलले आहेत. 'तसंच ज्यावेळी धनंजय मुंडे पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या विचारात होते तेव्हा काही घटना घडतात, मुंडेंना सोडू नका, असा सल्ला मीच धनंजय मुंडेंना दिला होता', असंही अजित पवार बोलले आहेत. 
 

Web Title: Ajit Pawar's big disclosure about Gopinath Munde