आज मेगाब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:33 IST2017-07-30T01:33:10+5:302017-07-30T01:33:28+5:30

आज मेगाब्लॉक
मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवर सीएसटी ते चुनाभट्टी-माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ३१ जुलैच्या रात्री वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्यामुळे नाईट ब्लॉक असेल.
दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यत दुरूस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉक दरम्यान दिवा ते कल्याण स्थानकांदरम्यानची डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येईल. त्यामुळे गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर सकाळी ९.५२ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद राहील. तर सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक सकाळी १०.३८ ते दुपारी ४.१३ वाजेपर्यत बंद राहील.