डोंबिवली शहर भाजपाने केला ऐश्वर्या देशमुखचा सत्कार
By Admin | Updated: December 26, 2014 22:54 IST2014-12-26T22:54:18+5:302014-12-26T22:54:18+5:30
ऐश्वर्या राजन देशमुख या विद्यार्थिनीने बीएससी शाखेत विद्यापीठात संख्याशास्त्र (स्टॅटिस्टीक) मध्ये पहिला क्रमांक मिळवला

डोंबिवली शहर भाजपाने केला ऐश्वर्या देशमुखचा सत्कार
डोंबिवली : ऐश्वर्या राजन देशमुख या विद्यार्थिनीने बीएससी शाखेत विद्यापीठात संख्याशास्त्र (स्टॅटिस्टीक) मध्ये पहिला क्रमांक मिळवला असून ९८.१७ टक्के गुण मिळवत विद्यापीठात दुसरी येण्याचा मान मिळवला. त्यानुसार, ‘विद्यापीठात झळकले डोंबिवलीचे ऐश्वर्य...’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत भाजपा डोंबिवली पूर्व मंडल विभाग पदाधिकारी, ग्रामीणचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तिचा यथोचित सन्मान केला.