ऐरोलीतील विजेचा लपंडाव थांबणार

By Admin | Updated: January 17, 2015 01:30 IST2015-01-17T01:30:42+5:302015-01-17T01:30:42+5:30

दिघा ते घणसोलीपर्यंत अनेक वर्षांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबणार आहे.

Airoli electricity halt will stop | ऐरोलीतील विजेचा लपंडाव थांबणार

ऐरोलीतील विजेचा लपंडाव थांबणार

नामदेव मोरे, नवी मुंबई
दिघा ते घणसोलीपर्यंत अनेक वर्षांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव थांबणार आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर महावितरणने नवीन पायाभूत आराखडा तयार केला असून या परिसरात ६८ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत.
नवी मुंबईमध्ये काही वर्षांपासून भारनियमन रद्द केले असले तरी प्रत्यक्षात मात्र दिघा, ऐरोली ते घणसोलीसह एमआयडीसीमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय होती. अचानक जाणाऱ्या विजेमुळे घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. विज भार वाढला की ट्रान्सफॉर्मरलाआग लागण्याच्या घटनाही घडल्या. (सविस्तर पान ४)

Web Title: Airoli electricity halt will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.