वायुप्रदूषण निर्देशांक बसवा - मनसे
By Admin | Updated: June 5, 2015 00:44 IST2015-06-05T00:44:47+5:302015-06-05T00:44:47+5:30
राज्यातील प्रमुख शहरांसह औद्योगिक शहरांमध्ये अधिकाधिक वायुप्रदूषण निर्देशांक बसविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे.

वायुप्रदूषण निर्देशांक बसवा - मनसे
मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांसह औद्योगिक शहरांमध्ये अधिकाधिक वायुप्रदूषण निर्देशांक बसविण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने पर्यावरणमंत्र्यांची भेट घेत त्यांना यासंदर्भातील निवेदन सादर केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या चार शहरांसह पालघर, बोईसर, कल्याण, डोंबिवली, नागोठणे आणि रसायनीसारख्या औद्योगिक शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील धुळीचे प्रमाण वाढते आहे.
सद्य:स्थितीमध्ये महाराष्ट्रात ३१ शहरांमध्येच वायुप्रदूषण निर्देशांक असून, त्यातील वरळी, तारापूर, महाड आणि डहाणूमधील निर्देशांक कार्यरत नाहीत. मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार द्यावेत.
जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मंडळाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे, अशा अनेक मागण्या पक्षाने सादर केलेल्या निवेदनात केल्या आहेत. (प्रतिनिधी)