Join us
Daily Top 2Weekly Top 5

वायूगळती : गॅस सदृश्य वास कमी झाला; आता होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 19:32 IST

शनिवारी रात्री पावणे दहा वाजल्यापासून चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर पूर्व-पश्चिम, पवई आणि अंधेरी येथील नागरिकांच्या गॅस सदृश्य वास येत असल्याच्या मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या.

 

  • कृपया घाबरून जाऊ नये.
  • परिस्थिती नियंत्रणात असून आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करण्यात आली.
  • सार्वजनिक उद्घोषणा करण्यासह गरज भासल्यास प्रतिसाद देणारी कृती करण्यास यंत्रणा सज्ज आहे.

 

मुंबई : शनिवारी रात्री पावणे दहा वाजल्यापासून चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर पूर्व-पश्चिम, पवई आणि अंधेरी येथील नागरिकांच्या गॅस सदृश्य वास येत असल्याच्या मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या. तक्रारी प्राप्त होताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी फायर इंजिन धाडण्यात आले. येथे कसून शोधून घेतला असता येणारा वास कमी झाला होता. मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून नागरिकांना ओल्या कपड्याने चेहरा झाकून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, या घटनेची चौकशी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीसांमार्फत सुरु आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वीच याच परिसरात गॅस सदृश्य वास येण्याची घटना घडली होती. त्याच घटनेची शनिवारी पुनरावृत्ती झाली. शनिवारी रात्री मुंबईच्या पूर्व उपनगरातून मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला गॅस सदृश्य वास येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या. अग्निशमन दल, पोलीस नियंत्रण कक्षास देखील या तक्रारी प्राप्त झाल्या. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कामकाजानुसार, याची माहिती संचालक औद्योगिक सुरक्षा, आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे अधिकारी, बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, महानगर गॅस, वायू प्रदूषण विभाग यांना देण्यात आली. शिवाय घटनास्थळी त्यांचे अधिकारी देखील तैनात करण्यात आले. मुंबई अग्निशमन दलाचे १३ फायर इंजिन घटनास्थळी धाडण्यात आले. तकारी प्राप्त झालेल्या ठिकाणी कसून शोधून घेण्यात आला. यावेळी येथील गॅस सदृश्य वास कमी झाला होता. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून तक्रारी प्राप्त झालेल्या ठिकाणांवरील नागरिकांना ओल्या कपड्याने चेहरा झाकून घेण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. गॅस सदृश्य वासामुळे कोणताही नागरिक रुग्णालयात दाखल झाला नाही. या घटनेची चौकशी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पोलीसांमार्फत सुरु आहे.   

टॅग्स :मुंबई