कोरोना शी लढण्यात हवाई दल तत्पर, तीन दिवसात 25 टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:03 PM2020-04-01T22:03:35+5:302020-04-01T22:03:35+5:30

कोरोना शी लढण्यात हवाई दल तत्पर, तीन दिवसात 25 टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक  लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई :  कोरोनावर ...

The Air Force is quick to fight Corona, transporting 25 tons of medical supplies in three days | कोरोना शी लढण्यात हवाई दल तत्पर, तीन दिवसात 25 टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक

कोरोना शी लढण्यात हवाई दल तत्पर, तीन दिवसात 25 टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक

Next

कोरोना शी लढण्यात हवाई दल तत्पर, तीन दिवसात 25 टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक 
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : 
कोरोनावर विजय मिळवण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत असताना भारतीय हवाई दल देखील त्यामध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत आहे. 

हवाई दलाने गेल्या तीन दिवसात दिल्ली,  सूरत व चंदीगढ 
येथून सुमारे 25 टन अत्यावश्यक वैद्यकीय सामग्री हवाई मार्गाने मणिपूर,नागालँड, जम्मू काश्मीर व लडाख मध्ये पोचवली आहे . या वैद्यकीय सामग्री मध्ये पीपीई कीट,  सँनिटायझर्स,  सर्जिकल हातमोजे, थर्मल स्कँनर 
यांचा समावेश होता त्याशिवाय वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तिथे पोचवण्यात आले. याशिवाय कोरोनाच्या तपासणीचे रुग्णाच्या स्त्रावाचे नमुने लडाख मधून दिल्लीला पोचवण्यात आले.  यामध्ये हवाई दलाच्या सी 17, सी 130 , एएन 32 ,एव्हीआरओ व डॉर्निअर विमानांनी सहभाग घेतला. 


संशयास्पद रुग्णांसाठी हवाई दलाने देशभरात विविध ठिकाणी कॉरंटाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 
इराण व मलेशिया येथून आणलेल्या भारतीय नागरिकांना 
हवाई दलाच्या कॉरंंटाईन विभागात ठेवण्यात आले आहे. कोरोना तपासणीसाठी बेंगळुरु येथील हवाई दलाच्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
हवाई दलाच्या विविध तळावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. विविध तळा शेजारील गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. 

 

 

Web Title: The Air Force is quick to fight Corona, transporting 25 tons of medical supplies in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.