Join us

हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 05:30 IST

हवाई वाहतूक तज्ज्ञ  नरेन मेनन यांनी एक्सवर म्हटले की, कंपन्यांना हवाई सीमा वापरासाठी देशाला शुल्क द्यावे लागते. या निर्णयामुळे पाकला रोज ७ लाख डॉलरवर पाणी सोडावे लागेल.

मनोज गडनीस

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकने आपली हवाई सीमा भारतीय विमानांसाठी बंद केली तरी त्याचा मोठा फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. कंपन्यांकडून जे हवाई प्रवास शुल्क दिले जाते, तो पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार आहे.

हवाई वाहतूक तज्ज्ञ  नरेन मेनन यांनी एक्सवर म्हटले की, कंपन्यांना हवाई सीमा वापरासाठी देशाला शुल्क द्यावे लागते. या निर्णयामुळे पाकला रोज ७ लाख डॉलरवर पाणी सोडावे लागेल.

पुलवामा हल्ल्यावेळी केलेल्या बंदीमुळे दिवसाला १०० मिलियन डॉलरचा फटका

पुलवामा हल्ल्याच्या वेळीही भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकची हवाई सीमा बंद केली होती. त्यावेळी दिवसाकाठी ४०० विमान पाकिस्तानची हवाई सीमा वापरत होते. मात्र, ते बंद झाल्यामुळे पाकिस्तानला १०० मिलियन अमेरिकी डॉलर इतका महसूल गमवावा लागला होता. पाकिस्तानकडून हीच चूक पहलगाम हल्ल्यानंतरही केली आहे.

भारतीय विमान कंपन्यांना आता युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशात जाण्यासाठी लांबून प्रवास करावा लागणार आहे. परिणामी, भारतीय विमानांना अधिक इंधन आणि प्रवास वेळ लागणार आहे. ही प्रवास वेळ दोन ते अडीच तासांनी वाढणार आहे. त्यामुळे या देशांकडे जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरांत वाढ होणार आहे.

टॅग्स :पाकिस्तान