कोरोना विरोधी लढा, यूपीएलची पंतप्रधान निधीसाठी ७५ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:47 PM2020-04-04T17:47:35+5:302020-04-04T17:48:15+5:30

कोरोनाविरोधी लढ्यासाठी सरकारला मदत म्हणून ७५ कोटींची मदत केली आहे.

Aid to the tune of 8 crore for UPL's prime fund: anti-Corona fight | कोरोना विरोधी लढा, यूपीएलची पंतप्रधान निधीसाठी ७५ कोटींची मदत

कोरोना विरोधी लढा, यूपीएलची पंतप्रधान निधीसाठी ७५ कोटींची मदत

Next

मुंबई :  पीक संरक्षण उत्पादने तयार करणाऱ्या यूपीएल कंपनीने कोरोनाविरोधी लढ्यासाठी सरकारला मदत म्हणून ७५ कोटींची मदत केली आहे. तसेच कंपनीच्या वतीने कोरोना विरोधी लढा देणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील हिरोना सातत्याने मोठ्या प्रमाणात वैयक्तिक सुरक्षा साहित्य पुरविण्यात येत आहे. यासोबतच कंपनीने आपल्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या कोरनटाईन केंद्रासाठी खुल्या करण्यात आलेआहेत.

याबाबत युपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ म्हणाले की, सर्व समाजासाठी आता आव्हानात्मक परिस्थिती आहे. कोरोना विरोधी लढ्यासाठी आपण देश आणि तज्ज्ञांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे. आम्ही आमच्या जबाबदारीशी कटिबद्ध आहोत. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारना सहकार्य करत आहोत. या शिवाय यूपीएलने केंद्र आणि राज्य सरकारना २००अत्याधुनिक फवारणी यंत्र आणि २२५ कर्मचारी देण्यात आले आहेत. कंपनीचे सदस्य स्थानिक प्रशासनला सार्वजनिक ठिकाणे,रुग्णालये,रस्ते, पोलीस स्थानके आदी ठिकाणी फवारणीसाठी सहकार्य करत आहेत.

Web Title: Aid to the tune of 8 crore for UPL's prime fund: anti-Corona fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.